BPSC Admit Card : बीपीएससी अर्थात बिहार लोकसेवा आयोगच्या (BPSC) 67व्या एकत्रित नागरी सेवा स्पर्धा परीक्षेचे प्रवेशपत्र आज, 25 एप्रिल 2022 रोजी जारी केले जाणार आहे. BPSC पूर्वपरीक्षा 8 मे रोजी राज्यातील 1083 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार सोमवारपासून (25 एप्रिल) आयोगाची अधिकृत वेबसाईट bpsc.bih.nic.in आणि onlinebpsc.bihar.gov.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतील.


बीपीएससीची ही पूर्व परीक्षा येत्या 8 मे रोजी दुपारी 12 ते 2 दरम्यान घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील 38 जिल्ह्यांमध्ये 1083 परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या परीक्षेत सुमारे 6 लाख उमेदवार बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया 30 सप्टेंबर 2021 रोजी सुरू झाली होती. या परीक्षेद्वारे एकूण 726 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. बीपीएससीच्या पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करायचे ते जाणून घेऊया...


कसे कराल प्रवेशपत्र डाऊनलोड :


* सर्वात आधी bpsc.bih.nic.in किंवा onlinebpsc.bihar.gov.in या वेबसाईटला भेट द्या.


* या वेब साईटवरील ‘BPSC 67th Combined Prelims Admit Card 2021’ या लिंकवर क्लिक करा.


* यानंतर तुमचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाका. तसेच, यात मागितलेले इतर तपशील व्यवस्थित भरा.


* सदर माहिती सबमिट केल्यावर, तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.


* प्रवेशपत्राची ही प्रिंट परीक्षेच्या वेळी जवळच ठेवा.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI