CBSE Admit Card 2023 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच, सीबीएसई बोर्डाची (CBSE Board) दहावी आणि बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. लवकरच विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र जारी करण्यात येईल. प्रवेशपत्र म्हणजेच, हॉल तिकीट जारी झाल्यावर विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र उपलब्ध होईल. विद्यार्थी cbse.nic.in आणि cbse.gov.in या वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतील.


CBSE Board Exam 2023 : लवकरच प्रवेशपत्र जारी होणार


सीबीएसई परीक्षेचे (CBSE Exam 2023) हॉल तिकीट (Hall Ticket) डाऊनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांच्या ओळखपत्रांसह CBSE बोर्डाच्या वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेची मदत घेता येईल. सीबीएसई बोर्ड परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक उपलब्ध झाल्यावर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल. 


सीबीएसई बोर्डाने cbseacademic.nic.in वर इयत्ता दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका, प्रश्न बँक आणि मार्किंग पॅटर्न जारी केला आहेत. विद्यार्थी वेबसाईटवर जाऊन ते चेक करू शकतात.


परीक्षा कोरोनापूर्वीच्या अभ्यासक्रमावर आधारित


दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या सत्र 2022-23 च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या (CBSE 12th Board Exam 2023) परीक्षा कोरोनापूर्वीच्या (Coronavirus) अभ्यासक्रमावर आधारित असतील. कोविडमुळे CBSE नं गेल्या वर्षी अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली होती. सीबीएसईचे परीक्षा (CBSE Exams) नियंत्रक संयम भारद्वाज यांनी इंडियन एक्सप्रेसला याबाबत माहिती दिली आहे.


CBSE Board Exam Time Table 2023 : 15 फेब्रुवारीपासून सीबीएसई परीक्षा


दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक देखील देण्यात आलं आहे.






यंदा सीबीएसई परीक्षा एकाच टर्ममध्ये


कोरोना काळात गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण 92.71 टक्के तर दहावीमध्ये 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसई (CBSE) बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा दिली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


​​CBSE 12th Date Sheet 2023: सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21मार्च आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI