CBSE Result 2022 : देशभरातील लाखो विद्यार्थी सीबीएसई दहावी बोर्ड (CBSE Result 2022) परीक्षेचा निकाल कधी जाहीर होतो? याची प्रतीक्षा करत होते. अखेर आज सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दोन वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशातील 94.40 टक्के विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. तुम्ही हा निकाल पुढील वेबसाईटवर पाहू शकता. 


CBSE 10th Result 2022 - Direct Link (Available Now)


'असा' तपासा निकाल 


-विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in, cbresults.nic.in ला भेट देऊ शकतात.
-यानंतर CBSE 10वी/12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
-आता तुमचा नोंदणी क्रमांक/रोल नंबर तसेच जन्म तारिख, शाळेचा नंबर इत्यादी माहिती भरा. 
-यानंतर 10वी आणि 12वी 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
-विद्यार्थ्यांना यानंतर त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करायचे आहेत.
-शेवटी निकालाची प्रिंट काढा.


सीबीएसईनं 26 एप्रिल ते 24 मे दरम्यान दहावीची परीक्षा घेतली होती. त्याचवेळी बोर्डातर्फे 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत बारावी वर्गाची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 21 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.  कोरोना महामारीच्या काळात सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा या दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टर्मची परीक्षा ही एप्रिल -मे महिन्यात घेण्यात आली. त्यामुळे राज्य मंडळाच्या आधी जाहीर होणारा सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल यंदाच्या वर्षी उशिराने जाहीर झाला.


एसएमएसद्वारे निकाल पाहता येईल
विद्यार्थी त्यांचे CBSE निकाल 2022 10वी आणि 12वीचे निकाल एसएमएसद्वारे देखील मिळवू शकतात. यासाठी तुमचा इयत्ता 10वी किंवा 12वीचा रोल नंबर टाका आणि हा एसएमएस 7738299899 वर पाठवा.



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI