CBSE 10th Compartment Results: सीबीएसईने दहावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल (CBSE 10th Compartment Results) जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.  ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना हजेरी क्रमांक, शाळेचा क्रमांक आणि हॉल तिकीट क्रमांक नोंदवावा लागणार आहे. 


CBSE Compartment Results 2022 चे निकाल या संकेतस्थळावर पाहा


> cbse.gov.in
> results.cbse.nic.in
> results.nic.in
> results.gov.in


ऑनलाइन निकाल कसा पाहाल?


- निकाल पाहण्यासाठी सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर लॉगिन करा.


- संकेतस्थळाच्या होम पेजवर न्यूज अँड इव्हेंटच्या टॅबवर क्लिक करा


- टॅबवर क्लिक केल्यानंतर दहावी कंपार्टमेंट निकालावर क्लिक करा


- लिंकवर क्लिक केल्यानंतर विचारलेली माहिती नमूद करा


- माहिती नमूद केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा


- सबमिट पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला निकाल स्क्रिनवर दिसेल 


- आता निकाल पाहा आणि त्याची प्रिंट काढा 


 यावेळी सीबीएसईच्या दहावी कंपार्टमेंटची परीक्षा 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट दरम्यान पार पडली. त्याआधी सीबीएसईने 7 सप्टेंबर रोजी बोर्डाने 12 वीचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा होती. 
 


कंपार्टमेंट परीक्षा म्हणजे काय?


दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेत एक अथवा दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कंपार्टमेंट परीक्षा आयोजित केली जाते. ज्या वर्षाच्या परीक्षेत विद्यार्थी नापास झाला असेल, त्याला त्याच वर्षात कंपार्टमेंट परीक्षा द्यावी लागते. महाराष्ट्र बोर्डाकडून पुरवणी परीक्षा आयोजित केली जाते. 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI