CA Foundation Result 2022 : Institute of Chartered Accountants of India CA Foundation Result 2022 आज, (10 ऑगस्ट 2022 रोजी) जाहीर करण्यात आला आहे. फाउंडेशन कोर्सचा निकाल पाहण्यासाठी संबंधित उमेदवार संस्थेच्या अधिकृत वेबसाईट icai.nic वरून CA फाउंडेशन जून 2022 चा निकाल डाउनलोड करू शकतात.
परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी उमेदवार त्यांचा पिन क्रमांक, जन्मतारीख किंवा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून, उमेदवार ICAI परीक्षा पोर्टलवर प्रवेश करू शकतात आणि त्यांचा CA फाउंडेशन जून 2022 चा निकाल डाउनलोड करू शकतात. सीए फाउंडेशन जून 2022 च्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी 25.28 टक्के आहे. त्याचबरोबर PQC ICAI निकाल 2022 देखील आज, 10 ऑगस्टला जाहीर झाला आहे.
CA फाउंडेशन 2022 च्या जून सत्रासाठीच्या परीक्षा ICAI द्वारे यापूर्वी 24 जून ते 30 जून 2022 या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. मात्र, आसाममधील पुरामुळे सिलचर परीक्षा केंद्रावरील काही परीक्षांचे वेळापत्रक पुनर्निर्धारित करावे लागले. जुलैमध्ये या चाचण्या घेण्यात आल्या. CA इंटरमिजिएट आणि फायनल मे 2022 चे निकाल ICAI ने आधीच जाहीर केले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच, सीए इंटरमिजिएट आणि सीए फायनल प्रोग्रामसाठी परीक्षा नोंदणी देखील लवकरच जाहीर केली जाणार आहे.
ICAI CA फाउंडेशन 2022 परीक्षेचा निकाल या साईटवर पाहू शकता :
- icaiexams.icai.org
- icai.nic.in
- icai.org
ICAI CA फाउंडेशन 2022 परीक्षेचा निकाल कसा पाहाल?
- ICAI परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या - icai.nic.in. (थेट लिंक वर दिली आहे)
- सीए फाउंडेशन निकाल जून 2022 लिंकवर क्लिक करा.
- पिन क्रमांक आणि जन्मतारीख किंवा अर्ज क्रमांक वापरून लॉग इन करा.
- CA फाउंडेशनचा जून 2022 चा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
- भविष्यातील संदर्भासाठी स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि सेव्ह करा.
महत्वाच्या बातम्या :
- Nanasaheb Thorat : मराठमोळ्या शास्त्रज्ञाला आयर्लंड सरकार आणि युरोपियन कमीशनकडून कॅन्सरवरील संशोधनासाठी 8 कोटींचा निधी
- UGC-NET Examination Postponed : NTA ने UGC NET परीक्षा फेज 2 पुढे ढकलली, जाणून घ्या परीक्षेची नवी तारीख
- Mission Admission : शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI