Board Exams Twice In A Year: नवी दिल्ली : नव्या शैक्षणिक धोरणानुसार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा (10th-12th Board Exams) वर्षातून दोनदा घेतल्या जातील, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. यावरुन पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही वेगवेगळी मतमतांतरं पाहायला मिळत आहेत. अशातच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Education Minister Dharmendra Pradhan) यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 2025-25 च्या शैक्षणिक सत्रापासून (Academic Session) विद्यार्थी वर्षातून दोनदा परीक्षा देऊ शकतील, त्या दृष्टीनं तयारी सुरू आहे, असं वक्तव्य केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केलं आहे. 


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी सांगितलं की, विद्यार्थ्यांना 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांना दोनदा बसण्याचा पर्याय असेल. छत्तीसगडमध्ये 'पीएम श्री' (प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया) योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रधान बोलत होते. या योजनेंतर्गत राज्यातील 211 शाळा श्रेणीसुधारित करण्यात येणार आहेत. पं. दीनदयाळ उपाध्याय सभागृह, रायपूर येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 


2025-26 पासून विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा दोनदा देता येणार : केंद्रीय शिक्षणमंत्री 


राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत केंद्राच्या योजनेबाबर बोलताना केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान म्हणाले की, "2025-26 या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत दोनदा बसण्याची संधी मिळेल. ते म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवणं, त्यांना गुणवत्तेनं समृद्ध करणं, त्यांना संस्कृतीशी जोडून ठेवणं आणि त्यांना भविष्यासाठी तयार करणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय असून भारताला विकसित देश बनविण्याचं हेच सूत्र आहे. तसेच, 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं हेच सूत्र आहे."


केंद्रीय मंत्री प्रधान यांनी राज्यातील पूर्वीच्या काँग्रेस सरकारवरही टीका केली आहे. ते म्हणाले की, मागील सरकारमध्ये शिक्षणाला प्राधान्य दिलं जात नव्हतं, तर नवनिर्वाचित विष्णू देव साईंच्या राजवटीत शिक्षणालाच आपलं प्राधान्य असल्याचं दिसून येतं. केंद्रीय मंत्री म्हणाले की, 'पीएम श्री योजने'च्या पहिल्या टप्प्यात छत्तीसगडमधील 211 शाळा (193 प्राथमिक स्तरावरील आणि 18 माध्यमिक शाळा) 'हब आणि स्पोक मॉडेल'वर अपग्रेड केल्या जातील.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI