Arts Stream Career Options After 12th : नुकताच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2022 Declared) झाला आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. बारावीचा निकाल तर लागला. परंतु, आता जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी मात्र, करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत. खरंतर, ही चिंता ज्यांनी मेरिट लिस्टमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे त्यांनाही आहे आणि जे उत्तीर्ण झाले आहेत त्यांनाही आहे. याचसाठी बारावीनंतर पुढे कोणता करिअर पर्याय निवडावा यासाठी आम्ही तुम्हाला कला शाखेतील (Arts) काही पर्याय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता.
बारावीनंतर कला शाखेतील पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षणाच्या संधी :
B.A. Economics : आर्थिक महासत्ता असलेल्या देशात विकासाच्या अनेक संधी आहे. आणि यासाठी आर्थिकदृष्ट्या ज्ञान असणे फार गरजेचे आहे. तुम्हाला जर व्यवहार, आर्थिक गणित, आकडेवारी, सांख्यिकीय तसेच GDP यामध्ये जर रस असेल तर तुम्ही नक्कीच B.A. Economics हा पर्याय निवडू शकता. यामध्ये तुम्ही मार्केट अॅनालिस्ट, बॅंकर, इकोनोमिस्ट रायटर तसेच प्रोफेसर देखील होऊ शकता.
B.A. Political Science : राज्य सेवा आणि लोकसेवा आयोग यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तर पॉलिटिकल सायन्स या विषयाचा फायदा होतोच. पण त्याचबरोबर पॉलिटीकल अनालिस्ट, कायद्याचा अभ्यास (Law), मार्केटिंग रिसर्च अॅनालिस्ट अशा वेगवेगळ्या संधी तुम्हाला निर्माण होतात. त्याचबरोबर पब्लिक रिलेशन सुद्धा (PR) तुम्ही करू शकता.
B.A. History : भारताचा तसेच जागतिक इतिहास जाणून घेण्याची, त्यातले संदर्भ गोळा करण्याची आणि त्याचा संग्रह गोळा करण्याची आवड असेल तर तुम्ही नक्कीच B.A. History हा विषय पदवीसाठी निवडू शकता. यामध्ये तुम्ही इतिहासकार, प्रोफेसर, पत्रकारिता करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर आर्किओलॉजीसुद्धा करू शकता.
B.A. Geography : भारतासह जगाची भ्रमंती करण्याची आवड असेल तर तुम्ही नक्कीच B.A. Geography या विषयात पदवी करू शकता. यामध्ये तुम्हाला प्रोफेसर, स्टडी अनालिस्ट, संशोधक, तसेच ट्रॅव्हल संबंधित नोकरीच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध असतात.
B.A. Marathi Literature : मराठी भाषेविषयी अभिमान आणि आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी मराठी वाड्.मय विषयाकडे वळावे. यामध्ये तुम्हाला समाज, साहित्य, संस्कृतीचा जवळून अभ्यास करता येतो. तसेच यामधून तुम्ही भाषा अभ्यासकार, प्रोफेसर, लिपीक, भाषांतरकार अशा अनेक संधी तुम्हाला निर्माण होतात.
या व्यतिरिक्त तुम्ही खालील कोर्स करून देखील उज्ज्वल भविष्य घडवू शकता.
- B.H.M. (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट )
- B.M.M. (बॅचलर इन मास मीडिया)
- फॅशन डिझायनिंग
- होम सायन्स
- इंटिरियर डिजाइनिंग
- ग्राफिक डिझाईन
- ट्युरिझम कोर्स
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra HSC Result : निकालाबाबत आक्षेप आहे? पुनर्मूल्यांकन करायचंय? उत्तरपत्रिका हवीय? मग हे करा
- Maharashtra HSC Result 2022: शत प्रतिशत! बारावी परीक्षेतील 24 विषयांचा निकाल 100 टक्के
- HSC Result 2022 : बारावीच्या निकालात मुलींची बाजी, 95.35 टक्के मुली उत्तीर्ण
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI