पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज दिवसभर सुरू असलेलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन आता मागे घेण्यात आलं आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याचसोबत तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल, 10 नोव्हेंबरच्या आत अंतिम वर्षाचे 95 टक्के निकाल लागतील, असं आश्वासन कुलगुरूंनी दिलं. यानंतर अभाविपने आंदोलन मागे घेतलं.


याचसोबत विधी विषयाचा पेपर सिस्टीममधून गायब झालेला नाही. त्याचे रेकॉर्ड्स विद्यपीठाकडे आहेत, असं स्पष्टीकरण कुलगुरूंनी दिलं.


पुणे विद्यापीठाच्या सिस्टीममधून विधी शाखेचा अंतिम वर्षाचा पेपर गायब झालेला आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षा पार पडत आहेत. परंतु, यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठ प्रशासनाकडे 14 हजार पेक्षा अधिक तक्रारी उपलब्ध झालेल्या असून त्यावर काय उपाययोजना करणार याबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेलं नाही. बीए एलएलबी अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठ पूर्वी देण्यात येणारी बीएची पदवी मिळणार नाही, असे सांगत आहे. तसेच इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाचे गुण गृहीत धरून उत्तीर्ण केले जाईल, असे प्रशासन सांगत आहे. परंतु, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन देखील अशा पद्धतीचा निर्णय का घेत आहे? अशा अनेक समस्यांबाबत अभाविपकडून पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ आंदोलन करण्यात आलं.


SPPU Final year exams | पुणे विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांसमोर तांत्रिक अडचणींची परीक्षा


कुलगुरुंनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
यावेळी कुलगुरुंशीच बोलायचं असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. पण, आज कुलगुरु विद्यापीठांत नाहीयेत. प्र कुलगुरु एन एस उमराणी आंदोलनकर्त्यांशी बोलण्यासाठी आले आहेत. पण कुलगुरुंशीच बोलायचं आणि ते आल्याशिवाय जाणार नाही अशी भुमिका आंदोलनकर्त्यींनी घेतली होती. अखेर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कुलगुरुंनी दिलेल्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.


ABVP Protest | पुणे विद्यापीठात अभाविपचं आंदोलन, कुलगुरुंना भेटण्यासाठी बॅरिकेटिंग तोडण्याचा प्रयत्न



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI