मुलुंड : इंटरनेटमुळे जगभरातील ज्ञान एका क्लिकवर मिळत आहे. मात्र, याचा कोण कसा वापर करील सांगता येत नाही. मुलुंडमधील काही तुरुणांनी युट्युब आणि इंटरनेट वर एटीएम मशीन कसे फोडावे याचे व्हिडीओ पाहून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. पण, एटीएम मशीनला आग लागल्याने घाबलेल्या आरोपींनी तिथून पळा काढला. या आरोपींना काही स्थानिक दक्ष नागरिकांमुळे बेड्या ठोकण्यात मुलुंड पोलिसांना अवघ्या बारा तासात यश आलं. यात चार तरुण आणि एका 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.


सलमान समसुद्दीन चौधरी, दुर्गेश रामबिहारी चौबे, शेहजाद रईसुद्दीन खान, अरमान मुस्ताक अहमद आणि एका अल्पवयीन आरोपी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व भांडुप चे रहिवासी आहे. 22 ऑक्टोबरच्या मध्यरात्री मुलुंडच्या मलबार हिल परिसरात चार जणांना संशयितरित्या फिरत असताना स्थानिकांनी हटकले होते. त्यांच्याकडे गॅस कटर, सिलेंडर अशा संशयास्पद गोष्टी स्थानिकांना सापडल्या होत्या. मात्र, पोलीस येईपर्यंत हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी नागरिकांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता त्यांना इथे असलेले इंडियन बँकेचे एटीएम जळालेल्या स्थितीत आढळले होते. पळून गेलेल्या चार जणांपैकी एकाचा मोबाईल स्थानिकांनी घेतला होता. त्यावरून पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता हा एटीएम लुटण्याचा कट दुर्गेश चौबे याने रचला होता.


औरंगाबादमध्ये ऑनलाईन IPL सट्टा सेंटर पोलिसांकडून उद्ध्वस्त; नोकरी गेल्यानं शिक्षिका करत होत्या कॉल सेंटरवर काम


गॅस कटरने एटीएम मशीन फोडताना आग लागली अन्..
दुर्गेश चौबे याने युट्युब आणि इंटरनेट वर एटीएम मशीन कटरच्या सहायाने कसे फोडावे याचे व्हिडीओ पहिले होते. तो डिलिव्हरी बॉय असल्याने त्याने मुलुंड मधील इंडियन बँकेचे मुलुंड मलबार हिल या निर्मनुष्य ठिकाणी असलेले एटीएम हेरले होते. त्यानंतर त्याने त्याच्या विभागात रहाणाऱ्या इतर चार जणांना प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याचे आमिष देऊन एटीएम मशीन लुटीचा कट रचला. कलर स्प्रे ने एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही बंद करुन एटीएम मशीन गॅस कटरच्या मदतीने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गॅस कटरमुळे एटीएमला आग लागली आणि मोठा धूर झाला. यामुळे घाबरून या सर्वांनी तिथून पळ काढला होता. मात्र, यातील अल्पवयीन मुलाला स्थानिकांनी हटकले. विचारपूस करत त्याचा मोबाईल स्थानिकांनी घेतला. या मोबाईलच्या मदतीने या सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेतले अन् या गुन्ह्याचा छडा लागला.


ATM Fraud | एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्यानं अनेकांना गंडा घालणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला बेड्या