मुंबई : कोरोनाच्या काळात सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणामध्ये गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुंबईत 'M ग्यान' ही चळवळ उभी राहिली आहे. मुंबईकरांचे जुने आणि वापरात नसलेले मोबाईल फोन एकत्र करून गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी ही चळवळ सुरू झालेली आहे. मोबाईल विकत घेण्याची क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना या जुन्या मोबाइलच्या वापरामुळे ऑनलाइन शाळांमध्ये आपली उपस्थिती नोंदवणे शक्य झाले आहे. रिनोव्हेट इंडिया आणि समर्पण या संस्थेच्या वतीने मुंबई आणि मुंबई बाहेरील नागरिकांकडून या गरीब विद्यार्थ्यांसाठी जुने वापरात नसलेले मोबाईल गोळा करून ते शाळांना देण्याचे काम सुरू झालेलं आहे.


एम ग्यान या चळवळी अंतर्गत अनेक लोकांकडून जुने मोबाइल त्यांच्या सहमतीने एकत्र केले जातात. त्यानंतर या मोबाईलचा दुरुपयोग होऊ नये यासाठी त्यांचे फॉरमॅट केले जातात. काही मोबाईल बिघडले असतील तर त्यांची दुरुस्ती केली जाते. मोबाईल, चार्जर आणि एक ईयर फोन असे पॅकिंग करून हे सर्व मोबाईल ज्या ज्या शाळांना हवे आहेत त्यांना ते पुरविण्यात येतात. मुंबईत अनेक कुटुंबीय अद्यापही दारिद्र रेषेखालील आहेत. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एम ग्यान ही चळवळ अत्यंत उपयोगी ठरत आहे.


पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेट सेवांची अत्यंत गरज


रिनोव्हेट इंडिया या संस्थेने या विद्यार्थ्यांसाठी एक सर्वे केलेला आहे. या सर्वेमध्ये पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेट सेवा यांची अत्यंत गरज असल्याचे लक्षात आले आहे. हा जिल्हा दुर्गम जिल्हा असल्यामुळे पूर्णक्षमतेने इंटरनेट सेवा उपलब्ध नाही. तसेच आदिवासी कुटुंबियांचा मोठा परिसर म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यात पेक्षा पालघर जिल्ह्यात अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी या मोबाईलची गरज असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आता मुंबईकरांनी देखील आपले वापरात नसलेले जुने मोबाईल फोन दान करून शिक्षणासाठी हातभार लावायला काहीच हरकत नाही.


मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या 20 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर! लवकरच बाकी विषयांचेही रिझल्ट लागणार


M ग्यान ही चळवळ अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सुरू केलेली आहे. गेली पाच महिने यावर आम्ही काम करत असून मुंबईकरांनी या चळवळीला अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे. या विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने शिक्षणाबरोबरच त्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. यावर उपाययोजना करण्याचे काम सध्या रिनोव्हेट इंडियाच्या वतीने सुरू झाले आहे. जुन्या मोबाईलचे संकलन, त्याची दुरुस्ती, त्याच्या वितरणाचे काम सध्या सुरू असून अनेक शाळांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. हे सर्व मोबाईल आम्ही विविध संस्थांना, शाळांना सुपूर्द करतो आणि त्यांच्या मार्फत ज्याला खरंच मोबाईलची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे मोबाईल पोहोचविले जात आहेत. या चळवळीला गरीब विद्यार्थ्यांनी देखील चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती रिनोव्हेट इंडियाचे अलोक कदम यांनी दिली.


Amravati University | परीक्षेतील घोळानंतर अमरावती विद्यापीठाच्या कारभारावर टीकास्त्र



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI