मुंबई : मुंबईच्या अंधेरी रेल्वे ट्रॅकवर व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला अंधेरी जीआरपीने अटक केली आहे. या तरुणाचं नाव अरमान शेख असून याने रेल्वे ट्रॅकजवळ दोन व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. एका व्हिडिओमध्ये हा ट्रॅकवर बसून आहे तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ट्रॅकच्या अगदी जवळ बसला असून याच्या अगदी पाठवून लोकल ट्रेन गेली आहे.
सध्या सोशल मीडियाच खुळ आहे आणि याच खुळामध्ये काही तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता रातोरात स्टार होण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून व्हिडीओ बनवतात. याच आशयाचा हा व्हिडीओ अरमान कडून बनवण्यात आला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अंधेरी जीआरपी पोलिसांनी आरमानचा शोध सुरू केला. पोलिसांना माहिती मिळाली की आरमान घाटकोपरमध्ये कुठेतरी राहतो. पोलिसांनी अरमानच्या घराचा पत्ता शोधला आणि त्याच्या घरी पोहोचले मात्र अरमान त्यावेळेस घरी नव्हता. कदाचित पोलिस त्याला शोधत असावेत याची त्याला कुणकुण लागली असावी. पोलिसांनी त्याचा शोध सुरूच ठेवला आणि शेवती अरमान पोलिसांच्या हाती लागला.
अंधेरी जीआरपीने अरमानला ताब्यात घेतला असून त्याची चौकशी केली जात आहे. अरमानवर या आधी सुद्धा मुंबईतील पार्क साईट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. अरमानला सोशल मीडियावर स्टंटबाजीचे व्हिडिओ टाकणे पसंत आहे अशाच एका व्हिडिओसाठी अरमान बाईकवर स्टंट करत होता ज्या संदर्भात त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.
अंधेरी जीआरपीने आरमान ला ताब्यात घेतला असून त्याची चौकशी केली जात आहे, अरमानवर या आधी सुद्धा मुंबईतील पार्कसाईट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे.. अरमानला सोशल मीडियावर स्टंटबाजी चे व्हिडिओ टाकन पसंत आहे अशाच एका व्हिडिओसाठी अरमान बाईक वर स्टंट करत होता ज्या संदर्भात त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता...
अंधेरी जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर व्युज,लाइक्स वाढवण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले जातात, आणि जसे जसे लाईक्स वाढतात तसे तसे व्हिडिओ बनवणाऱ्यांना पैसे मिळतात. काही वेळेला तर कंपन्याच व्हिडिओ बनवणाऱ्याला सल्ला देतात की तुम्ही कसे व्हिडिओ बनवावेत. व्हिडिओ बनवणाऱ्यांना कुठल्या प्रकारचे व्हिडिओ लोकांना आवडतात याचा सविस्तर अभ्यास या कंपन्या करतात. व्हिडिओ बनवणाऱ्याला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे याचा सल्लाही देतात. अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यामध्ये तरुण पिढी जास्त पुढे असते आणि म्हणून पोलिसांनी सुद्धा तरुणांना आवाहन केले आहे की अशा प्रकारचे जीव घेणे व्हिडीओ बनवू नये जेणेकरून त्यांच्या आणि इतरांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो.