Ambernath Crime News : आपल्या प्रेयसीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून धडा शिकवण्याच्या उद्देशाने प्रियकरानं हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. इतकच काय तर यासाठी त्याने एका निरपराध तरुणाचा बळीही घेताल. प्रियकराने प्रेयसीला फसवण्यासाठी तरुणाची गळा चिरून निर्घुणपणे हत्या केली. आणि त्याच्या खिशात आपल्या प्रेयसीचे वोटर कार्ड आणि चिट्ठी ठेवली. जेणेकरून पोलिसांच्या तपासात आपल्या प्रेयसीने हत्या केली म्हणून तिला अटक होईल.


पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून प्रियकरला या हत्येप्रकरणी अटक करून त्याचा संपूर्ण डाव उधळून लावला. अंबरनाथच्या चिखलोली एमआयडीसी परिसरात एक एप्रिलच्या शुक्रवारी एका तरुणाची गळा चिरून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. मात्र ही हत्या कोणत्या उद्देशाने झाली याचा काही सुगावा पोलिसांना लागत नव्हता. हत्या झालेल्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या खिशात अनिता काटे या महिलेचा वोटर आयडी आणि एक चिट्ठी पोलिसांना मिळून आली. तोच धागा पकडत पोलिसांनी तपास सुरू केला. 


या तपासादरम्यान नुकताच जेलमधून बाहेर आलेल्या वामन शिंदे याच्या पर्यंत तपासाचे धागेदोरे जाऊन पोहोचले. पोलिसांनी अनिता काटे आणि वामन शिंदे या दोघांनाही संशयित म्हणून ताब्यात घेतलं. यावेळी अधिक चौकशी केली असता वामन शिंदे आणि अनिता काटे यांचे पंधरा वर्षापासून अनैतिक संबंध होते, मात्र एका प्रकरणात वामन शिंदे याला जेलची हवा खावी लागली. काही वर्ष तो जेल मध्ये होता, मात्र तिथून सुटून आल्यानंतर त्याने आणि अनितावरचे  इतर व्यक्तीशी संबंध असल्याच्या त्याला संशय आला. त्यामुळे त्याने अनिताला धडा शिकवण्याचे ठरवलं. त्यानुसार त्याने कल्याणचा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नाक्यावर नाका कामगार म्हणून उभ्या असलेल्या अमित दास याला बदलापुरात एक काम आहे, असं सांगून घेऊन आला. आणि अमितची त्याने गळा चिरून निर्घृण हत्या केली. अनिताला अडकवण्यासाठी त्याने अमितच्या खिशात तिचं वोटर आयडी आणि चिठ्ठी ठेवली. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करून या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि मारेकरी वामन शिंदे यालाच चौकशीनंतर अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.