Yavatmal Crime Update : संतापाचा कळस व्हावा अशा काही घटना आपल्या अवतीभवती घडत असतात. अशीच एक घटना यवतमाळमध्ये समोर आली आहे. एका कुत्रीसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या 65 वर्षीय वृध्दाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  ही घटना शहरातील पिंपळगाव बायपास मार्गावर 12 एप्रिलला रात्रीच्या सुमारास घडली. शेख खलील शेख नदीम (65) रा. बुटले ले-आऊट, पिंपळगाव असे त्या वृध्दाचे नाव आहे.


या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस सुत्रांकडून मिळोलल्या माहितीनुसार, घाटंजी पंचायत समितीतील ग्रामसेवक अक्षय देशमुख हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास धामणगाव चौफुलीवरून पिंपळगाव बायपासने जात होते. यावेळी पिंपळगाव बायपास मार्गावर देशमुख यांना एका श्वानचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळं ते त्या ठिकाणी थांबले. 


त्यावेळी त्यांना एक वृध्द श्वानासोबत अनैसर्गिक कृत्य करताना आढळून आला. दरम्यान देशमुख यांनी त्या श्वानाला वृध्दाच्या तावडीतून सोडवले. त्यावेळी त्या वृध्दाने देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली. 


त्यामुळे ग्रामसेवक देशमुख यांनी परिसरातील नागरिकांना बोलावून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांना नागरिकांच्या मदतीने त्या वृध्दाला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी ग्रामसेवक अक्षय देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या वृध्दावर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस करीत आहे.


माणूस किती क्रूर आणि नराधम असू शकतो असंच हे उदाहरण आहे. आपण वेगवेगळ्या प्रकाराच्या अत्याचाराच्या घटना ऐकून असतो. यवतमाळमधील या घटनेनंतर प्राणीप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी आणि प्रसिद्ध तेलगु कवी वरवरा राव यांना जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार
Electricity : शाळांच्या तोडलेल्या वीज जोडण्या पुन्हा सुरू कराव्यात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
Chandrakant Patil : हिंदुत्व हा भाजपाचा श्वास, चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर
Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 124 रुग्णांची नोंद तर 113 कोरोनामुक्त
Latur : भीमजयंतीनिमित्त लातुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फुटी भव्य पुतळा