Gujrat Crime News : सायबर गुन्ह्याचं एक धक्कादायक प्रकरण गुजरातमध्ये उघडकीस आलेय. मोबाईल स्क्रीनवर न्यूड व्हिडीओ रेकॉर्ड करुन लाखोंचा गंडा घातला जात होता. आधी मैत्री करायची... त्यानंतर चॅटिंग करायचं अन् त्यानंतर न्यूड व्हिडीओ कॉल करायचं... हे सर्व झाल्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी देत पैशांची मागणी केली जात होती. गुजरातमध्ये घडलेलं हे  प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणलेय. आरोपींनी एका तरुणाकडून 5.65 लाख रुपये लुबाडले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना उत्तर प्रदेशमधील कानपूर येथून अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.


नेमकं प्रकरण काय ? 


सुरतमधील एका तरुणाला फेसबुकवर एका तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यानंतर दोघांनी चॅटिंग सुरू झाले. काही दिवस दोघांमध्ये व्हॉट्सअॅपवर सतत बोलणं होत होते. दोघांमध्ये अश्लील भाषेतही बोलणं होत होते. तरुणीने त्या तरुणाला एकादा व्हिडिओ कॉल केला, ज्यामध्ये ती नग्न अवस्थेत होती.  त्या तरुणासोबत तो व्हिडिओ आरोपीने रेकॉर्ड केला. यानंतर ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू झाला. तरुणीने त्याच्याकडून लाखो रुपये घेतले. 



न्यूड व्हिडीओच्या नावाखाली 5.65 लाख लुबाडले - 


वारंवार पैसे देऊनही धमकी काही थांबत नव्हती, त्यामुळे सुरतमधील तरुणाने पोलिस स्टेशन गाठलं. त्याने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, युट्यूबवर न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने मेसेज आणि व्हिडिओ कॉल केले. त्याने सांगितले की, मुलीने त्याच्याविरुद्ध एफआयआरही दाखल केला आहे. यानंतर यूट्यूबवरून व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पैशांची वारंवार मागणी सुरू झाली. त्या तरुणाने सुरत सायबर क्राईम सेलशी संपर्क साधून गुन्हा दाखल केला.


आरोपींना ठोकल्या बेड्या - 


व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. वारंवार पैसे घेण्यात आले. सूरतमधील त्या तरुणाची 5.65 लाख रुपयांची फसवणूक केली. यानंतरही पीडितेचे फोन येणे थांबले नाही. आरोपी त्याच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. त्यामुळे त्रस्त होऊन त्या तरुणाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. ज्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आले, तेथून तपास सुरु झाला. पोलीस तात्काळ  गुन्हेगारांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या.  


याप्रकरणी सूरत सायबर क्राइम सेलचे एसीपी युवराज सिंह गोहिल यांनी सांगितले की, आयपीसी 384, 170, 171, 507 120 (बी) आणि कलम 66 (सी) 66 (डी) 66 (सी) आणि  67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी तांत्रिक निगराणीच्या आधारे बँक खातेदार रोहित कुमार, अंतू मदारी वाल्मिकी यांना कानपूर देहाट येथून अटक करण्यात आली आहे.