Washim News वाशिम : राज्यात गुटखा (Gutkha) आणि तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थावर बंदी आहे. मात्र नव-नवी शक्कल लावून छुप्या मार्गाने प्रतिबंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक होत असते. आशा छुप्या कारवाईवर पोलिसांकडून बारीक नजर ठेवली जाते. मात्र, नवनव्या युक्त्या आणि उपाय काढत हे तस्कर छुप्या कारवाई करत असतात. अशाच एका छुप्या कारवाईचा वाशिम शहर पोलिसांनी (Crime) भंडाफोड केला आहे. मालेगाव कडून वाशिम  शहराच्या दिशेने एक वाहन येत असून यात प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना (Washim Police) मिळाली होती.


या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत या वाहनाची अडवणूक करून तपासणी केली असता त्यात तब्बल 10 लाख रुपये किंमतीचा अवैध गुटखा मिळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना संशय येऊ नये म्हणून या छुप्या कारवाईत चक्क  स्कूल बसचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 10 लाख रुपयांच्या मुद्देमालासह एकाला अटक केली असून पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहेत.


चक्क स्कूल बसमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक 


मालेगावकडून वाशिम शहराच्या दिशेने एक शाळकरी विद्यार्थ्यांची बस येणार असून यात छुप्या मार्गाने प्रतिबंधित तंबाखूजन्य  पदार्थांची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाशिम शहरालगत नाका बंदी केली आणि  स्कूलबसची अडवणूक करून झडती घेतली. दरम्यान यात पोलिसांना जवळ जवळ 10 लाख रुपये किंमतीचा अवैध गुटखा मिळून आला.


40 लाख 18 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त


या प्रकरणी पोलिसांनी मिळालेला 10 लाख रुपयांच्या गुटखा आणि 30 लाख रुपये किमतीची स्कूल बस आणि इतर साहित्य असा एकूण 40 लाख 18 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी संशयित आरोपी आणि बस चालक सलमान खान (रा. मेडशी जि. वाशिम) याला अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांनी संशयित आरोपी विरोधात विविध कलमा अन्वये गन्हा दाखलकेला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 



 


Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator