वर्धा : राष्ट्रीय महामार्गावर शस्त्राचा धाक दाखवून कारसह साडे चार कोटीच्या दरोडा प्रकरणाचा छडा पोलिसांनी अवध्या 15 तासात लावला असून या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. वर्धा पोलिसांच्या 15 जणांच्या टीमने आरोपींनी अटक करत त्यांच्याकडून तीन कोटी 46 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वर्धा पोलिसांच्या या टीमचं कौतुक होत असून त्यांना 50 हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे.
वर्ध्यात गुरूवारी राष्ट्रीय महामार्गावर चोरांनी एका कारसह साडेचार कोटी लंपास केले होते. नागपूरहून हैद्राबादकडे जात असताना पोहणा शिवारात वाहनावर लाल दिवा लावून येत वाहनासह रोकड पळविली होती. त्यानंतर वर्धा पोलिसानी लवकर हालचाली करत 15 जणांची टीम तयार केली आणि या प्रकरणाचा तपास केला. वर्धा पोलिसांनी पाच आरोपींनी अटक केली. पोलिसांनी आरोपींना नागपूरातून ताब्यात घेतलं. यासाठी नागपूर, अमरावती येथील पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचं त्यांना सहकार्य मिळालं.
वर्धा पोलिसांनी अवघ्या 15 तासांमध्ये या प्रकरणाचा छडा लावला. त्यामुळे त्यांच्या टीमला 50 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
मुंबईत रचला 35 लाखांच्या चोरीचा बनाव
मुंबईत अजब प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने नवीन घर खरेदी केलं. पण त्यासाठी आवश्यक रक्कम त्याला जमा करता आली. कोणताही मार्ग न सुचल्याने त्याने शक्कल लढवली. त्याने आपल्या मित्रासह 35 रुपये चोरी झाल्याचा बनाव रचला. 32 वर्षीय आरोपीने मध्य मुंबईतील माटुंग्यातही चोरी झाल्याचं सांगितलं. परंतु पोलिसांनी दोन तासात या प्रकरणाचा उलगडा केला आणि बनाव रचणाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
अंधेरी पूर्व इथे वास्तव्यास असलेला अजित पटेल हा बुधवारी माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये आला. नप्पू रोडवरील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी 35 लाख रुपये ठेवलेली बॅग पळवल्याचं त्याने सांगितलं. अजित तक्रार घेऊन येताच माटुंगा पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. घटनेबाबत आणखी माहिती मिळवण्यासाठी अजित पटेल आणि त्याच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीची विचारपूस केली.
पोलिसांनी दोघांची वेगवेगळी चौकशी केली. तपासात समोर आलं की चोरीच्या ज्या घटनेबाबत ते बोलत आहेत, त्यात बऱ्याच विसंगती आहेत. अजित पटेल याने सांगितलेल्या घटनास्थळी पोहोचले. आजूबाजूच्या सीसीटीव्हीची तपासणी केली. परंतु या ठिकाणी अशी कोणतीही लूट झाली नसल्याचं त्यात दिसलं. यामुळे संशय आल्याने पोलिसांनी अजित पटेल याच्या मोबाईल फोनच तपास केला. तांत्रिक विश्लेषणात हा संशय अधिक बळावला.
ही बातमी वाचा: