Wardha Crime News : मुंबई येथील सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये फरार आरोपीला वर्ध्यात ताब्यात घेण्यात आलं. वर्धा आरपीएफने अतिशय शीताफिने त्या चोरट्याला ताब्यात घेतलं आहे. मुंबईत चोरी करून हा चोरटा गीतांजली एक्सप्रेसने 13 लाख रुपये चोरून पळाला होता. याबाबत वर्धा आरपीएफ ला माहिती देण्यात आली आणि त्यांनी सतर्क राहत गीतांजली एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आल्यावर अतिशय शीताफिने चौकशी केली. एका संशयित व्यक्तीला विचारपूस केल्यावर त्याला ताब्यात घेतलं. बॅगेची तपासणी केली आणि त्यानंतर चोरीतील आढळलेल्या मुद्देमालानुसार तोच मुंबईतून 13 लाख रुपये चोरून पळालेला चोरटा असल्याची खात्री पटली.


RPF ने कसा सापडला पळालेला चोरटा? :
दिनांक 20 ऑगस्टला आरपीएफ पोस्ट नागपूर निरीक्षक तथा CIB नागपुरद्वारा आरपीएफ पोस्ट वर्धाचे निरीक्षक आर.एस. मीना यांना फोनद्वारे कल्पना दिली. सांताक्रुज पोलीस स्टेशन मुंबई येथील फरार आरोपी गीतांजली एक्सप्रेसमध्ये 13 लाख रुपये चोरून पळाला आहे. या माहितीवरून मंडल सुरक्षा आयुक्त नागपूर यांच्या निर्देशानुसार आरपीएफ पोस्ट वर्धाचे निरीक्षक आर एस मीना, आरक्षक मंगेश दुधाने तथा सेवाग्राम चौकीचे  उप निरीक्षक ए के शर्मा व आ मुस्ताख शेख गीतांजली एक्सप्रेस मध्ये वर्धा ते नागपुरच्या दरम्यान पोलीस आरोपीच्या शोधात होते. त्यावेली कोच नं एस 7 सीट नं 62 नंबर वर एक संशयित व्यक्ती दिसली..त्याला विचारपूस केल्यावर दीपक व्ही नाईक वय 44 वर्ष राहणार बिबोड नायक देउला, बलेश्वर राज्य ओड़ीसा असे सांगितले.. त्यानंतर पोलिसांकडे असलेल्या फोटो वरून आरोपीचा चेहऱ्याची ओळख केली गेली. त्यांनतर आरोपीला आरपीएफ पोस्ट नागपूर पाठविण्यात आले. जिथे निरीक्षक वर्षा व निरीक्षक CIB द्वारा आरोपीला सखोल विचारपूस केल्यावर आरोपीने 13 लाख रुपयांच्या चोरीचा गुन्हा कबूल केला..


कुटुंबीयांच्या खात्यात टाकली चोरीची रक्कम: 
आरोपीची चौकशी आणि तपासणी केल्यावर त्याच्या बॅग मधून  4 लाख 11 हजार 70 रुपये नगदी तसेच एक सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण  5 लाख 6 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल आणि मग काही कागदपत्रे सापडली.. उर्वरित रकमेबाबद विचारपूस केली असता. आरोपीने सांगितले की, त्याने  2 लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात आणि 3 लाख रुपये आईच्या खात्यात तसेच  2 लाख रुपये  पत्नीच्या खात्यात  असे एकूण 7 लाख रुपये जमा केले असल्याचं सांगितलं.पोलिसांनी सापडलेला मुद्देमाल जप्त करून नागपूरकडे सुपूर्द केला.


वर्धा RPF च्या प्रयत्नांनी सापडला मुंबईतून पळालेला चोरटा :
आरपीएफ पोस्ट वर्धा के निरीक्षक आर एस मीना, आरक्षक मंगेश दुधाने तसेच सेवाग्राम चौकीचे उप निरीक्षक ए के शर्मा आणि आ मुस्ताख शेख द्वारा अथक प्रयत्नांनी सांताक्रूज पोलिस स्टेशन येथे दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात यश आले आहे..