छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडणार. यावेळी माध्यमांशी बोलताना सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Beed Crime News) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, न्यायदेवतेवर आमचा विश्वास, संतोष देशमुख यांना (Beed Crime News) न्याय मिळेल. त्याचबरोबर आरोपी सुटणार असून त्यांची हत्तीवरून (Beed Crime News) मिरवणूक काढणार असल्याच्या अफवांची गंभीर दखल घेऊन न्यायालय किंवा संबंधित यंत्रणा योग्य ती कारवाई करेल असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.(Beed Crime News)

Continues below advertisement

पुढे बोलताना धनंजय देशमुख यांनी म्हटलं की, आरोपी नंबर एकची बेल अ‍ॅप्लिकेशन आलेली आहे, त्यावर १२ डिसेंबरला सुनावणी देखील झालेली आहे, परंतु राहिलेली उर्वरित सुनावणी आज आहे, आजच्या दिवशी जे फिर्यादीचे वकील आहेत, आणि आरोपीचे वकील आहेत ते युक्तिवाद करतील. आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून आज आम्ही इथे आलेलो आहोत, न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा इतकीच आमच्या अपेक्षा आहे, आम्ही सिस्टीम मधील ज्या काही समित्या असतील एसआयटी (sit) असेल, राज्याचे मुख्यमंत्री आणि न्यायालयावर विश्वास ठेवून आहोत आणि आम्हाला त्यांनी न्याय द्यावा इतकेच आमच्या अपेक्षा आहे, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.(Beed Crime News)

जे आरोपीचे समर्थन करणारे लोक आहेत ते आरोपी अटक झाल्यापासून आत्तापर्यंत अशा वल्गना करत आहेत, की आरोपी सुटणार आहेत, त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार, किंवा सेलिब्रेशन करणार तर हा कुटुंबाला भयभीत करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे परंतु अशा काही गोष्टी होणार नाहीत, सगळा 18 पगड जातीतील समाज या राज्यातील प्रत्येक घटक देशमुखांसोबत आहे, त्याचं कारण म्हणजे एका निष्पाप माणसाला या क्रूरकर्मी लोकांनी संपवला आहे, आणि त्यांना शिक्षा त्यांना भेटली पाहिजे या भूमिकेत आम्ही आहोत, न्यायालयाने आणि मुख्यमंत्र्यांनी हे ठरवलं पाहिजे, ज्या अर्थी आरोपीचे समर्थक असं बोलतात, आरोपी सुटणार तर त्यांना कायदा किती कडक आहे आणि कायद्याची कारवाई काय आहे हे त्या समर्थन करणाऱ्या लोकांना दाखवून दिले पाहिजे असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

आज औरंगाबाद खंडपीठात वाल्मीक कराड याच्या जामीनावर सुनावणी होणार आहे शुक्रवारी ही सुनावणी अर्धवट राहिली होती आज ही सुनावणी पूर्ण होईल असे वाटते या सुनावणीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही न्यायालयात पोहोचले आहेत.