England vs Afghanistan : विश्वविजेत्या इंग्लंडने स्वप्नातही कल्पना केली नसेल अशी दमदार कामगिरी आज अफगाणिस्ताने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर केली. विश्वविजेत्या इंग्लंडला 210 धावांमध्ये गुंडाळत 69 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्तानची फिरकी त्रिमूर्ती असलेल्या मुजीबूर रहमान (3 विकेट), रशीद खान (3 विकेट) आणि मोहम्मद नबी (2 विकेट) यांनी आठ विकेट घेत इंग्लंडला पार नेस्तनाबूत झाला. फारुकी आणि नावीन हकने प्रत्येकी एक विकेट घेतली. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतना 284 धावा कुटल्या. इंग्लंडने या सामन्यामध्ये तब्बल सात गोलंदाजांचा वापर केला, तरीही  अफगाणिस्तानला रोखण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आलं नाही.






अफगाणिस्तानचा डाव शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर संपला. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. 285 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या इंग्लंडची अवस्था सुद्धा अत्यंत बिकट झाली. 4 बाद 91 अशी अवस्था 17.2 षटकांत झाली. अफगाणिस्तानच्या फिरकी माऱ्यासमोर इंग्लंडचा एकही फलंदाज तग धरू शकला नाही. यामध्ये फक्त मधल्या फळीतील हॅरी ब्रुकचा अपवाद राहिला. त्याने 61 चेंडूत 66 धावा करत इंग्लंडचा डाव सावरला. 


अफगाणिस्तानचे प्रशिक्षक इंग्लंडचे जोनाथन ट्राॅट 


मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने कोणत्याही फलंदाजाची अपेक्षित साथ मिळाली नाही. फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचा डाव पूर्णपणे अडकला. या संपूर्ण अफगाणिस्तानच्या खेळीचे श्रेय अर्थातच अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्राॅट यांना जाते. ते इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आहेत. ते सध्या अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकांच्या भूमिकेत आहेत.






त्यामुळे इंग्लंडच्या संघाची कच्चे दुवे त्यांना अगदी जवळून होते. त्याचाच प्रत्यय आजच्या सामन्यांमध्ये आला. अफगाणिस्तानकडून आज फिरकीचा प्रभावीपणे मारा केला. मुजीब, रशीद खान आणि नबीने तब्बल आठ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. 






अफगाणिस्तान फिरकीच्या जाळ्यामध्ये इंग्लंडचा संघ पूर्णतः अडकून गेला. कोणत्याही फलंदाजालांचा फिरकीचा सामना करता आला नाही. याचे श्रेय प्रशिक्षक आणि गोलंदाजांना आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या