Uran Murder : रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. उरणमधल्या सातरहाठी गावात राहणारी तरुणी 25 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. याबाबत उरण पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. शनिवारी उरणमधल्या एका पेट्रोल पंपाच्या मागील मैदानावरच्या झुडूपामध्ये त्या तरुणीचा मृतदेह आढळून आला. शरीरावर वार करुन तिची निर्घृण हत्या करण्य़ात आल्याचं स्पष्ट झालं. दगडानं ठेचून तिचा चेहरा विद्रुप करण्यात आला तर प्रायव्हेट पार्टवर धारधार शस्त्रानं वार करण्यात आला. नवी मुंबईतल्या उरणमध्ये झालेल्या या घटनमुळे खळबळ उडाली आहे.


या तरूणीची हत्या होऊन तीन  दिवस झाले तरी अजून पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे संतापलेल्या उरणमधल्या रहिवाशांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला जातोय. याप्रकरणी पोलिसांना दाऊद शेख नावाच्या तरुणावर संशय आहे. त्याच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांची टीम बंगळुरूला गेली आहे. 


दाऊद शेखकडून तरूणीचं शारीरिक शोषण ( Uran Girl Murder Case )


सन 2018 साली संबंधित तरुणी दाऊद शेख नावाच्या तरुणाच्या संपर्कात आली होती. उरणमध्ये ट्रक ड्रायव्हर असलेल्या दाऊद शेखनं तरुणीचं शारीरिक शोषण केलं. या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. 


या गुन्ह्यात आरोपी दाऊद शेखला तुरुंगवास झाला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून दाऊद शेख बाहेर आला आहे. बाहेर आल्यानंतर दाऊद शेखनं तरुणीशी संपर्क साधून तिचं अपहरण केल्याचा संशय आहे. 


राज्य महिला आयोगाने घेतली दखल (State Commissions for Women) 


उरण प्रकरणावर आता समाजातून आणि राजकीय पक्षामधूनही प्रतिक्रिया येत आहेत. या हत्या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून आरोपींना तातडीने पकडण्यात यावं आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असं सांगितलं आहे. 


दाऊद शेख दोषी असेल तर त्याला कडक शिक्षा व्हायला हवी. पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळणं गरजेचं आहे. कायद्याचा असा धाक बसायला हवा की असं कृत्य करण्याची हिंमतच आणखी कुणाची होऊ नये. 


ही बातमी वाचा: