PUBG या जीवघेण्या खेळाचं भूत तरुणाईच्या मानगुटीवरून उतरण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. उत्तर प्रदेशमधील एका मुलाने पब्जी खेळू न दिल्यामुळे जन्मदात्या आईची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर या 16 वर्षीय मुलाने मृतदेह लपवण्याचा प्रयत्नही केला. तब्बल दोन दिवस मृतदेह घरातच होता. मृतदेहाची दुर्गंधी लपवण्यासाठी या मुलाने रुम फ्रेशनर्सचा वापर केलाय.
पब-जी खेळू न दिल्यानं लखनौमध्ये 16 वर्षीय मुलाकडून आईची हत्या. वडिलांच्या पिस्तुलातून गोळ्या झाडून झोपलेल्या आईचा जीव घेतला. हत्या लपवण्यासाठी आईचा मृतदेह दोन दिवस घरातच ठेवला. रूम फ्रेशनर वापरून मृतदेहाची दुर्गंधी लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतदेहाचा वास येऊ लागल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले.. त्यानंतर त्यांनी त्या मुलाची चौकशी केली. तर वीज ठिक करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने हत्या केली असं सांगितलं. त्यावर पोलिसांनी 10 वर्षीय बहिणीची चौकशी केली, असता तिने वास्तव सांगितले. मृत महिलेचं नाव साधना असे आहे.
ADCP कासिम अब्दी हे या प्रकरणाचा तापस करत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अब्दी म्हणाले की, 16 वर्षीय आरोपी मुलाला मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियाचं प्रचंड व्यसन लागलं होतं. काही केल्या त्याचं व्यसन सुटत नव्हते. मृत साधना यांचे पती लष्करात जेसीओ आहेत. सध्या ते पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे कार्यरत आहेत. साधना लखनौमधील पीजीआई येथे 16 वर्षीय मुलगा आणि 10 वर्षीय मुलीसोबत राहत होती. मुलाला लागलेलं व्यसन काही केल्या सुटत नव्हते. त्यामुळे वारंवार साधना त्याला बोलत होती. रविवारीही आईनं मुलाला मोबाईलवर PUBG खेळल्याबद्दल खडसावलं होतं, त्यामुळं रागाच्या भरात मुलानं जन्मदात्या आईची हत्या केली. रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास साधना झोपली, तेव्हा मुलानं वडिलांच्या परवाना असलेल्या पिस्तुलानं आईवर गोळ्या झाडल्या. तसेच कुणालाही सांगू नकोस म्हणून बहिणीला धमकावलं. हत्या लपवण्यासाठी आईचा मृतदेह दोन दिवस घरातच ठेवला. रूम फ्रेशनर वापरून मृतदेहाची दुर्गंधी लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.