Ulhasnagar Crime Updates : उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी एका डॉक्टरसह दोघांना अटक केली आहे. या डॉक्टरने आपल्या हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या नर्सचा मोबाईल स्नॅचिंग करण्याची सुपारी दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प नंबर एक भागात लाईफ केअर हॉस्पिटल आहे. इथे एक महिला नर्स काम करते. तिला चार एप्रिलपासून सुट्टी देण्यात आली होती. मात्र 10 एप्रिलला तिला पुन्हा हॉस्पिटलमधून कामावर येण्यासाठी सांगण्यात आले. त्यामुळे ती निघाली मात्र सी ब्लॉक रोडवर एका अज्ञात व्यक्तीने तिचे केस पकडून मोबाईल जबरीने मोबाईल स्नॅचिंग करून धूम ठोकली.
मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अवघ्या 24 तासात अरशद खान या आरोपीला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मोहम्मद खान याने त्याला मोबाईल स्नॅचिंग करण्यासाठी सांगितले असल्याने त्याला देखील अटक करण्यात आली. या दोघांकडे अधिक तपास केला असता लाईफ केअर हॉस्पिटलचा डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख याने या नर्स महिलेचा मोबाईल जबरीने खेचण्यासाठी सुपारी दिली असल्याचे समोर आले.
यासाठी या दोघा आरोपींना डॉक्टर मोहम्मदने दहा हजार रुपये देखील दिले होते. नर्स महिलेच्या मोबाईलमध्ये डॉक्टरचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो असल्याचा संशय डॉक्टरला होता आणि त्याच कारणामुळे या नर्सचा मोबाईल जबरीने स्नॅचिंग करण्याची सुपारी डॉक्टर आणि त्याच्या सहकार्याने दिली असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. दरम्यान याप्रकरणी आता मध्यवर्ती पोलिसांनी डॉक्टरसह दोघांना अटक केली आहे, तर एक आरोपीचा पोलिसांकडून अजूनही शोध सुरू आहे.
इतर बातम्या
- Hingoli : शिक्षकी पेशाला काळिमा, आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार
- नात्याला काळिमा! स्वतःच्या पत्नीवर बलात्कार करण्यासाठी पतीने मित्राला पाठवले घरात
- महिला दिनीच महिलेची आत्महत्या; मुलगा होत नसल्याने छळ केल्याचा नातेवाईकांचा आरोप
- जालन्यातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीसोबत हिंगोलीत अत्याचार, 23 दिवसानंतर सुटका