बुलढाणा : मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा या गावात एक महिला तिच्या दोन तरुण मुलींची हत्या झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पिंपळखुटा या गावात एक 55 वर्षीय महिला आपल्या दोन 25 व 28 वर्षीय तरुण मुलींसह राहत होती. त्यातील एक मुलगी विधवा होती, परवा रात्रीपासून त्या अचानक बेपत्ता झाल्याचं शेजारील लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांची शोधाशोध सुरु केली. दरम्यान, गावाजवळील एका शेतातील विहिरीजवळ एका महिलेचा मृतदेह गावातील काही लोकांना आढळून आला. हा मृतदेह त्याच महिलेचा असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी ऐका संशयिताला ताब्यात घेतलं. त्याने दिलेल्या महितीवरुन महिलेच्या दोन्ही मुलींना त्याच विहिरित धकलुन दिल्याचं सांगितलं.


पोलिसांनी दोन्ही मुलींचे व त्यांच्या आईचा मृतदेह काढून उत्तरीय तपासनिसाठी पाठवला आहे. अनैतिक संबंधातुन ह्या तीन हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


बहिणीच्या मागे लागू नको असे सांगितल्यामुळे टवाळखोराकडून भावाची हत्या


मोताळा तालुक्यातील पिंपळखुटा बुद्रूक (लांडे) शिवारात महिलेचा खून करण्यात आल्याचे रात्री समोर आले होते. आज दुपारी 15 ऑक्टोबरला सकाळी या महिलेच्या दोन्ही मुलींचाही खून करून विहिरीत फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून मुलींबाबत माहिती समोर आली आहे. या मुलींपैकी एक अनैतिक संबंधातून पाच महिन्यांची गर्भवती होती. खुनाचे कारण अद्याप वृत्त लिहेपर्यंत समोर आले नव्हते. पोलीस ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून माहिती घेत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी या घटनेची अधिक माहिती आज दिली.

चार्ल्स शोभराज बनण्याचं स्वप्न भंगले... गुन्ह्यांच्या अर्धशतकाजवळ पोहोचलेल्या गुन्हेगाराला विलेपार्ले पोलिसांकडून अटक


पिंपळखुटा बुद्रूक येथील शंकर त्र्यंबक मालठाणे हे पत्नी सुमनबाई (वय 55), विधवा मुलगी राधा (वय 28), घटस्फोटित मुलगी शारदासह (वय 25) राहतात. त्यांच्या एका मुलीच्या अनैतिक संबंधाबाबत गावात चर्चा होती. या संबंधातून ती 5 महिन्यांची गर्भवती राहिल्याचीही कुजबूज होती. 14 ऑक्टोबरला पहाटे तीनच्या सुमारास सुमनबाई व दोन्ही मुली राधा व शारदा घरातून गायब झाल्या होत्या. काल संध्याकाळी सुमनबाईचा मृतदेह शिवारातील रामेश्वर मालठाणे यांच्या शेतातील हौदात पाण्यात रक्तबंबाळ अवस्थेत सापडला होता. त्यांच्या दोन्ही मुली राधा व शारदा बेपत्ता होत्या.


अनैतिक संबंधातून खून
अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची तक्रार पोलीस पाटील शेषराव उमाळे यांनी बोराखेडी पोलीस ठाण्याला दिली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात खुन्याविरुद्ध गुन्हा नोंद करून बोराखेडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली व संशयावरून या प्रकरणी दादाराव महेसागर यास अटक करून त्यास पोलिसी हिसका दाखवून विचारपूस केली. त्याने दोन्ही मुली गावाजवळीलच एका विहिरीत (महिलेचा मृतदेह आढळला त्याच्या अगदी जवळच) असल्याचे सांगितले. त्या वरून पोलिसांनी दोन्ही बहिणींचे मृतदेह बाहेर काढून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. या तिहेरी हत्याकांडामुळे अवघा जिल्हा हादरला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.


पती म्हणाला, 'ते मूल माझं नाही', बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत ठेवत पोबारा, पुण्यातील संतापजनक प्रकार