मुंबई : वसईत एका पती आपल्या पत्नीला शोधण्यासाठी चक्क बाईक चोरी करत असल्याचे पोलीस तपासातून उघडं झालं आहे. कौटुंबिक आयुष्यात अनेक अडचणी होत्या. त्याची बायको त्याला सोडून गेली होती. बायकोला शोधण्यासाठी तो बाईक चोरी करत होता. बायको मिळाल्यानंतर चोरीची बाईक तेथेच सोडून द्याचा, आतापर्यंत त्यांने पाच बाईक चोरल्याच तपासात उघड झाले आहे.
लहू लक्ष्मण राठोड असे आरोपीचे नाव आहे. आपल्या पत्नीला शोधण्यासाठी चक्क रस्त्यावर पार्क असलेल्या मोटरसायकल चोरायचा. बायको मिळाली की मोटरसायकल तेथेच ठेवून देत असे. तसेच बाईकमधील पेट्रोल संपलं तरीही बाईक तेथेच ठेवायचा. वसई विरार शहरात एक कॅमेरा शहरासाठी या संकल्पनेतून दुकानदारांनी लावलेल्या कॅमे-यात हा चोरटा कैद झाला आणि माणिकपूर पोलिसांच्या तावडीत सापडला.
प्रणेश वर्तक यांची हिरो होंडा कंपनीची पॅशन प्लस ही बाईक वसईतील दत्ताञय शॉपींग सेंटर समोरुन 17 ऑक्टोबरला रोजी चोरीला गेलेली. वर्तक यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीवीच्या आधारे चोरटयाचा फोटो हेरला आणि विशेष टिम नेमून आरोपीला बेडया ठोकल्या. माञ तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी लहू राठोड हा मजूरीचं काम करायचा. चुलत्याने एकदा मोटारसायकल डायरेक्ट चालू केल्याने त्याला ही युक्ती समजली. आरोपी राठोडच्या कौटुंबिक आयुष्यात अनेक अडचणी होत्या. त्याची पत्नीबरोबर भांडण होत असल्याने, त्याची पत्नी त्याला सोडून गेलेली होती. पत्नीला शोधण्यासाठी हा बाईक चोरायचा. बाईकमधील पेट्रोल संपलं की हा बाईक तेथेच ठेवून द्याचा. त्यानंतर पुन्हा आपल्या बायकोला शोधण्यासाठी बाईक चोरायचा. राठोडला फक्त मोटारसायकल डायरेक्ट चालू करण्याची माहिती असल्याने हा स्कुटी न चोरता फक्त मोटारसायकली चोरत असे. माणिकपूर पोलिसांना यांनी पाच बाईक चोरल्याची कबूली राठोडने दिली आहे.