मुंबई : सोशल माध्यमाचा गैरवापर करत तरुणांना सेक्स्टॉर्शन प्रकरणात (Mumbai Sextortion Case) अडकवून त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या सांताक्रूज पोलिसांनी (Santacruz Police) आरोपींना राजस्थानमधील (Rajasthan) लेवाडा येथून अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तोहिद जाफर अली (22 वर्ष), वारीस जाफर अली (19 वर्ष) या दोघांना अटक केली असून एक अल्पवयीन आरोपीला देखील ताब्यात घेतले आहे. 


अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी पाच मोबाईल हस्तगत केले आहेत. आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून अजूनही काही नागरिकांना ब्लॅकमेलिंग करून फसवले आहे का याचा तपास सांताक्रूज पोलीस करत आहेत.


गोरेगावमध्येवृद्ध महिलेच्या घरात सेक्स रॅकेट


मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगाव परिसरात चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. हे सेक्स रॅकेट एका घरातून चालवण्यात येत होते. एका 64 वर्षीय महिलेच्या घरातून सेक्स रॅकेट सुरू असल्याचे माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 10 ने या कारवाईत एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. 


मुंबईमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटविरोधात मुंबई पोलिसांची कारवाई सुरू असते. मुंबई पोलीस गु्न्हे शाखा युनिट 10 ला गोरेगाव पश्चिम येथे एका घरातून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती समजली. त्यानंतर पोलिसांनी  कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर येथील इमारत क्रमांक 16 मधील रुम क्रमांक 242 मधून रॅकेट सुरू असल्याचे आढळून आले. 


या प्रकरणी अरूणा संतोष सिंग (64 वर्ष),  रेश्मा फरीद शेख (30 वर्ष) आणि रिझवान नसीर सय्यद (31 वर्ष) हे तिघे हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात आढळून आले आहे. या कारवाईत एक 16 वर्षीय मुलगी आणि एका महिलेची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत मुलीची सुटका केली आहे.  पोलिसांनी रिझवानला अटक केली केली असून पुढील तपास सुरू आहे.


मुंबईत यापुर्वीदेखील पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. अनेक हायप्रोफाइल प्रकरणे उघडकीस आणली होती. मात्र, गोरेगाव मधील निवासी परिसरातील इमारतीमध्ये सेक्स रॅकेट चालवण्यात येत असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 


ही बातमी वाचा: