मुंबई: चित्रकार चिंतन उपाध्यायला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पत्नी हेमा आणि तिचे वकील हरेश भंबानी यांच्या हत्येप्रकरणी चित्रकार चिंतन उपाध्यायला (Chintan Upadhyay) झालेली जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने काल (सोमवारी) स्थगित केली आहे. तसेच, त्याला जामीन देखील मंजूर केला आहे. चिंतन उपाध्यायला  (Chintan Upadhyay) जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देत सर्वोच्च न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. 2015 मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडात सहभागी असल्याच्या आरोपात चिंतन उपाध्यायला दोषी ठरवण्यात आले होते.


चिंतन उपाध्यायची  (Chintan Upadhyay) पत्नी हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरेष भंबानी यांची हत्या झाली होती, त्यांचे खोक्यात भरलेले मृतदेह कांदिवली येथील एका नाल्यात सापडले होते. याप्रकरणी चिंतन उपाध्याय आणि अन्य आरोपींना दोषी ठरवत दिंडोशी सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला हायकोर्टात दिलेलं आव्हान निकाली लागेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती देत चिंतन उपाध्यायला (Chintan Upadhyay) तूर्तास जामीन मंजूर करण्यात आला आहे.


काय केला युक्तीवाद?


केवळ सहआरोपींनी दिलेला जबाब हाच चिंतनविरोधातील पुरावा असल्याचा कोर्टात चिंतनच्या बचावात दावा करण्यात आला आहे, तसेच सहआरोपी प्रदीप राजभरनं पुढे जबाब बदलल्याचीही कोर्टात माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर 2023 मध्ये हायकोर्टानं चिंतनविरोधात सबळ पुरावे असल्याचा दाखला देत त्याचा जामीन फेटाळला होता, हायकोर्टाच्या या निर्णयाला चिंतननं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 


चिंतन उपाध्यायला  (Chintan Upadhyay) हेमा आणि तिच्या वकिलाच्या हत्या करण्यासाठी प्रवृत्त करणं आणि हत्येचा कट रचल्याच्या आरोपाच्या अंतर्गत दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. त्याचबरोबर प्रदीप राजभर, विजय आणि शिवकुमार राजभर या तिघांनाही आरोपींना हत्या, हत्येचा कट आणि गुन्हा केल्याचे पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांत दोषी ठरवण्यात आलं होतं. चिंतनसह (Chintan Upadhyay) या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला हायकोर्टात दिलेलं आव्हान निकाली लागेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती देत चिंतन उपाध्यायला (Chintan Upadhyay) तूर्तास जामीन मंजूर करण्यात आला आहे.


या प्रकरणात, सहआरोपी राजभर याचा कबुलीजबाब जबरदस्तीने घेण्यात आला. त्यानंतर, सत्र न्यायालयाने या कबुलीजबाबाची स्वत:हून दखल घेऊन, तो स्वीकारार्ह आणि प्रमाणित मानण्याची चूक केली. तसेच, याच कबुली जबाबाचा आधार घेऊन आपल्या विरोधात पुरेसे पुरावे नसताना देखील सत्र न्यायालयाने आपल्याला दोषी ठरवले, असा दावा चिंतन उपाध्यायने अपिलात केला होता. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने त्याला मोठा दिलासा दिला आहे.