Solapur Crime: सोलापूर (Solapur) जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्याची त्याच्याच आईच्या प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मृत चिमुकल्याचे नाव फरहान जाफर शेख (वय ३) असे आहे. तर आरोपीचे नाव मौलाली उर्फ अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला असे असून, त्याला सोलापूरच्या एमआयडीसी पोलिसांनी (Solapur Police) अटक केली आहे.
Solapur Crime: विवाहबाह्य संबंधातून सोलापुरात वास्तव
याबाबत अधिक माहिती आशिक की, मृत फरहानची आई शहनाज आणि आरोपी मौलाली यांचे विवाहबाह्य संबंध होते. या कारणामुळे मूळचे विजयपूर (कर्नाटक) येथील असलेले शहनाज आणि मौलाली हे दोघे सोलापुरात वास्तव्यास आले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
Solapur Crime: रागाच्या भरात कृत्य
पोलिसांच्या माहितीनुसार, 11 डिसेंबरच्या रात्री तीन वर्षाच्या फरहान झोपलेला असताना त्याची 'शी' कपड्याला लागल्याने रागाच्या भरात आरोपी मौलाली याला राग अनावर झाला. रागाच्या भरात आरोपीने चिमुकल्यावर मारहाण केली आणि त्याचा गळा दाबला. शहनाज घरी आल्यानंतर फरहान खाली पडल्याने डोक्याला मार लागल्याचे आरोपी मौलाली उर्फ अकबर याने सांगितलं. त्यामुळे आरोपी मौलाली आणि शहनाज हे बेशुद्ध फरहानला घेऊन विजयपूर येथे गेले. मात्र, विजयपूर येथे एसटी स्टँडवर पोहोचताच मौलाली तिथून पळून गेला. यानंतर शहनाज हिने पहिल्या नवऱ्यासोबत फरहानला विजयपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच फरहानचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
Solapur Crime: शवविच्छेदनातून हत्येचा उलगडा
फरहानच्या शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. त्यानुसार शहनाजचा प्रियकर मौलाली उर्फ अकबर मुल्ला याच्याविरोधात विजयपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ही घटना सोलापुरात घडलेली असल्याने, गुन्हा सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
Solapur Crime: आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी मौलाली उर्फ अकबर मुल्ला याला अटक केली आहे. आरोपीकडून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे सोलापूरसह संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निष्पाप चिमुकल्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा