Solapur Crime News: दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यातील वडापूर (Vadapur) गावात एका धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काटा काढलाय. सविता जकप्पा पुजारी (वय 35, रा. हत्ताळी, ता. चडचण, जि. विजयपूर) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती जकप्पा मणगेरी पुजारी (रा. हत्ताळी, ता. चडचण, जि. विजयपूर) याला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. (Solapur Crime News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जकप्पा पुजारी हा ऊसतोड कामगार असून त्याचे कर्नाटकातील विजयपूर येथील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पत्नी सविताला मिळाली होती. या कारणावरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. काही दिवसांपूर्वी जकप्पा हा वडापूर येथील दत्तात्रय गणेशकर यांच्या शेतात ऊसतोड कामासाठी दाखल झाला होता.
Solapur Crime News: कडाक्याचं भांडण झालं अन्...
त्याच ठिकाणी दाम्पत्यामध्ये पुन्हा एकदा अनैतिक संबंधाच्या विषयावरून जोरदार भांडण झाले. वाद तीव्र होताच जकप्पा हा रागाच्या भरात गेला आणि त्याने जवळच असलेल्या कोयत्याने पत्नी सविताच्या डोक्यावर व गळ्यावर सलग प्रहार करून तिचा खून केला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.
Solapur Crime News: आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उधार, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, सहायक फौजदार रवींद्र चव्हाण यांसह मंद्रूप पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी खून करण्यात वापरलेला कोयता जप्त केला असून आरोपी जकप्पा पुजारी याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी दादागोंड महादेव कट्टीमनी (रा. सातपूर, ता. इंडी, जि. विजयपूर) यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास फौजदार राजकुमार डांगे करीत आहेत.
Solapur Crime News: मोहोळमध्ये विवाहित महिलेने संपवलं जीवन
दरम्यान, सासरच्या मंडळानी दिलेल्या त्रासाला कंटाळून मोहोळ येथील एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वाती जयंत थोरात (33) असे मृत महिलेचे नाव आहे. स्वाती हिचा मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी येथील जयंत थोरात यांच्यासोबत 2015 साली विवाह झाला होता. मात्र लग्नानंतरपासून सासरची मंडळी हे वारंवार तिला त्रास देतं होते. काही दिवसापासून तीच्या चारित्र्यावर देखील संशय घेण्यात येत होता. तसेच माहेरहून 5 लाख रुपये घेऊन ये असा तगादा देखील लावण्यात आल्याचा आरोप मृत स्वातीच्या कुटुंबियांनी केला. याच त्रासाला कंटाळून स्वातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी स्वातीचे पती जयंत थोरात, सासरे चंद्रकांत थोरात, सासू सिंधुमती थोरात, नणंद आश्विनी पाटील या सर्वांच्या विरोधात मोहोळ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आलाय.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा