Grahan Yog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्ष संपून लवकरच नवीन वर्ष 2026 सुरु होणार आहे. हे नवीन वर्ष (New Year 2026) अनेक शुभ आणि अशुभ योग घेऊन येणार आहे. याच दरम्यान सूर्य (Sun) आणि राहू (Rahu) ग्रहाचा अशुभ योगदेखील निर्माण होणार आहे. द्रिक पंचांगानुसार, 2026 मध्ये सूर्य ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी राहू आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे ग्रहण योग (Grahan Yog) निर्माण होणार आहे. 

Continues below advertisement

खरंतर, नवीन वर्षाच्या 13 फेब्रुवारी रोजी सूर्य ग्रह कुंभ राशीत जाणार आहे. या ठिकाणी दोन्ही ग्रहांची युती होईल. आणि सूर्य-राहूची ही युती 15 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. ज्योतिष शास्त्रात ग्रहण योग फारच अशुभ मानला जातो. त्यामुळे नवीन वर्षात कोणकोणत्या राशींवर संकटाचं सावट असणार आहे ते जाणून घेऊयात. 

कर्क रास (Cancer Horoscope)

नवीन वर्ष 2026 मध्ये ग्रहण योग जुळून आल्याने कर्क राशीवर आर्थिक स्थिती ओढावू शकते. या काळात गुंतवणूक किंवा व्यवहाराच्या बाबतीत कोणतीच जोखीम हातात घेऊ नका. तुमच्या खर्चात अचानकपणे वाढ होऊ शकते. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांचा पगार उशिराने होऊ शकतो. त्यामुळेच कुठेही पैसे खर्च करताना नीट विचारपूर्वक खर्च करा. जुन्या कर्जाचा डोंगर तुमच्यावर येऊ शकतो. 

Continues below advertisement

कन्या रास (Virgo Horoscope)

नवीन वर्षात ग्रहण योग निर्माण झाल्याने कन्या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव दिसून येईल. या काळात आर्थिक बाबतीत नवीन वर्ष तुमच्यासाठी फार आव्हानात्मक ठरेल. तसेच, कोणत्याही व्यवसायात किंवा गुंतवणुकीत तुम्हाला अनिश्चितता दिसून येईल. या काळात तुम्ही घेतलेले मोठे निर्णय देखील फसू शकतात. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार कठीण असणार आहे. यासाठीच तुमचा बजेट आखून पैसे खर्च करा. 

मीन रास (Pisces Horoscope)

2026 मध्ये जुळून येणाऱ्या ग्रहण योगामुळे मीन राशीच्या लोकांवर दु:खाचा डोंगर कोसळू शकतो. हा काळ तुमच्यासाठी फारच कष्टायचा असणार आहे. त्यासाठी आर्थिक बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. जर तुम्ही एखादं नवीन प्रोजेक्ट हाती घेणार असाल तर त्याच्या परिणामांना सुद्धा सामोरं जायला तयार व्हा. नोकरीत प्रमोशन मिळवताना अनेक अडखळे येऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक वस्तूंची खरेदी करणं टाळा.  

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 23 December 2025 : आज विनायक चतुर्थीच्या दिवशी 7 राशींना पावणार गणराया; समोर आलेलं विघ्न टळेल, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य