Mumbai Airport Gold Seized : आजकाल काही लोक सोप्या मार्गानं पैसे कमवण्यासाठी तस्करीचा पर्याय अवलंबतात. पण हे गुन्हेगार पोलिसांच्या हातून काही सूटत नाहीत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMI Airport Mumbai) कस्टम विभागानं कारवाई करत 12 किलो सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची किंमत 5.38 कोटी रुपये आहे. तस्करांनी कमरेला लावायच्या पट्ट्यामधून सोनं तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. सहा प्रवाशांनी खास डिझाईन केलेल्या बेल्टमधून 5.38 कोटी रुपये किमतीचे 12 किलो सोनं तस्करी करण्याचा प्रयत्न करताना कस्टम विभागानं परदेशी नागरिकाला पकडलं. याप्रकरणी सहा प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
 
12 किलो सोनं जप्त (12 Kg Gold Seized at Mumbai Airport)


मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर सुदानी (Sudan - Country in North Africa) नागरिकाला अटक केली त्याच्याकडे खास डिझाईन केलेल्या बेल्टमधून 12 किलो सोनं जप्त करण्यात आलं. यावेळी त्याला इतर काही प्रवाशांनी मदत केली. काही प्रवाशांनी त्याला पळून जाण्यास मदत करण्यासाठी गोंधळ घातला, परंतु सोने तस्करी करणाऱ्या व्यक्तीसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.' 


'कस्टम अधिकाऱ्याने अधिक माहिती देत सांगितलं की, आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सीमाशुल्क कायद्याच्या कलम 110 अंतर्गत जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात सोन्याच्या तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे.' मुंबई विमानतळावर उत्तर आफ्रिकेकडील देश सुदान येथील नागरिकाकडून 12 किलो सोनं जप्त करण्यात आलं. या नागरिकाला इतर पाच जणांना सुरक्षा यंत्रणांपासून वाचत सोनं तस्करी करण्यास मदत केलीी. मात्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर या तस्करी करणाऱ्या सहा जणांना कस्टम विभागाकडून अटक करण्यात आली आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.


 महत्त्वाच्या इतर बातम्या