मुंबई : पुणे हिट अँड रनची घटना ताजी असताना मुंबईच्या सायन हॉस्पिटलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायन हॉस्पिटलचे डीन राजेश ढेरे यांचा कारने महिलेला धडक दिली. या अपघातात एका 60 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रुबेदा शेख, वय 60 वर्ष ही महिला काल सायन रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेली होती. मात्र संध्याकाळी साडेआठच्या सुमारास उपचार घेऊन हॉस्पिटलच्या गेट नंबर 7 मधून बाहेर येत असताना त्यांचा अपघात झाला. महिला सायन हॉस्पिटलचे डीन राजेश ढेरे यांच्या कारने हॉस्पिटलच्या आतमध्ये जाताना महिलेला धडक दिल्याने अपघात होऊन महिलेचा जागेवरच मृत्यू झाला आहे.


सायन हॉस्पिटलच्या डीनच्या कारची महिलेला धडक


सायन पोलिसांनी सकाळी अकरा वाजता महिलेचा मुलाला या घटनेबद्दल माहिती दिली. मृत रुबेदा शेख यांचा मुलगा सहनावाज शेख यांनी डॉ. राजेश ढेरे यांच्यावर हत्येच्या गुन्हा दाखल करा, असा आरोप करत मागणी केली होती. त्यानंतर सायन पोलिसांनी डॉ. राजेश ढेरे यांच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करत डॉ. राजेश ढेरे यांना अटक केली आहे.


महिलेचा जागेवरच मृत्यू


आरोपी डॉक्टर राजेश ढेरे हा दारू पिऊन गाडी चालवत होते का या संदर्भात सायन पोलिसा पुढील तपास आणि सर्व टेस्ट करत आहेत. सायन पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला एक्सीडेंटल आणि डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे मृत्यू झाल्याचा केस दाखल करून पुढील तपास सुरु केला. त्यानंतर आता या प्रकरणात सायन पोलिसांना डॉक्टरला अटक केली आहे.


डीन डॉ. राजेश ढेरे अटकेत


आरोपी डॉ. राजेश डेरे यांना सायन पोलिसांनी अटक केली आहे. सायन हॉस्पिटलचे डीन राजेश डेरे यांच्या विरोधात सायन पोलिसांनी कलम 304A, 338, 177, 279, 184, 203 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरने पोलिसांपासून अपघाताबद्दलची माहिती लपावली. मात्र महिलेचा बॉडीवर असलेल्या जखमावरून पोलिसांनी अपघाताचा अँगलने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर डॉक्टरच्या कारनेच अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सायन पोलिसांनी राजेश डेरे विरोधत गुन्हा दाखल करून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला. पोलिसांना यामध्ये यश मिळालं असून आरोपी डॉक्टर राजेश डेरेला सायन पोलिसांनी अटक केली आहे.