सिंधुदुर्ग : गेल्या काही महिन्यांपूर्वी एका जंगलात (Forest) विदेशी पर्यटक महिलेचा जिवंतपणे बांधून ठेवल्याचा धक्कादायक व माणूसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला होता.  सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात एक मूळ अमेरिकन महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या महिलेला सिंधुदुर्गमधून रत्नागिरी येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान ती महिला प्रथमदर्शी मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं होतं. आता, पुन्हा एकदा सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील एका जंगलात नेपाळी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या युवकाचा आंबोली घाटातील दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मालवण जंगलातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील नांदोस गावातील जंगलमय भागात पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सांगाड्यासोबत घड्याळ, बॅग, मोबाईल देखील सापडला आहे. त्यावरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर सांगाडा हा कट्टा येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी तरुणाचा असून याबाबत त्याच्या भावाने त्या ठिकाणी सापडलेल्या साहित्याची ओळख पाठविली आहे. याप्रकरणी, मालवण पोलीस अधिक करीत आहेत.

दरीत कोसळलेला मृतदेह बाहेर काढला

कोल्हापूर येथील पर्यटकाचा काल सायंकाळी आंबोली जवळील गेळे गावातील कावळेसाद पॉईंट येथे पाय घसरून 300 फूट खोल दरीत कोसळला होता. आज सकाळपासून शोध मोहीम राबवत दुपारी 12 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सकाळपासून कावळेसाद पॉईंट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. आता मृतदेह बाहेर काढल्यानंतर कावळेसाद पॉईंट पर्यटनासाठी सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक पुन्हा कावळेसाद पॉईंट येथे दाखल होत पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.

हेही वाचा

बीड शॉकिंग घटना, ग्राहकांची बिले नगरपालिकेच्या नावावर टाकली; 39 लाखांचा अपहार,2 अभियंते निलंबित