Shraddha Murder Case Aftab Confession: दिल्लीमध्ये झालेल्या हत्येने देशभरासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. हत्येच्या दीड आठवड्याआधीच श्रद्धाला मारण्याचा प्लॅन बनवण्यात आला होता. श्रद्धाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आफताबने याची कबुली दिली आहे. मृतदेह कसा आणि कुठल्या चॉपरने कापला जातो, हेही त्याने इंटरनेटवर सर्च केलं होतं. या सगळ्याबद्दल आफताबने स्वतः आता आपल्या कबुलनाम्यात माहिती दिली आहे.  


आपल्या कबुलनाम्यात काय म्हणाला आहे आफताब? 


1. हत्येच्या दीड आठवड्याआधीच श्रद्धाची हत्या करायचं हे ठरवलं होतं. 


2. माझं आणि श्रद्धाचं भांडण झालं होतं. मी त्याचदिवशी हत्येचा विचार केला होता.


3. पण अचानक श्रद्धा भावूक झाली. रडायला लागलाय आणि मी तिला सोडून दिल. 


4. श्रद्धा आणि माझ्यातल्या भांडणाचं कारण माझं इतर कुणाशी फोनवर बोलणं असायचं. 


5.  तिला माझ्यावर संशय होता. त्यामुळे ती सारखी संतापायाची आणि वाद घालायची. 


6.  18 मी रोजी आमचं भांडण झालं आणि मी त्याचदिवशी तिची हत्या केली. 


7. मी घाबरलो होतो. मला माहित होतं, मी तिचा मृतदेह दहन केला तर पकडलो जाईल. 


8. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मी इंटरनेटवर पूर्ण रात्र सर्च करत राहिलो. 


9. मृतदेह कसं आणि कुठल्या चॉपरने कापले जाते, हे मी इंटरनेटवर सर्च केलं.


10. क्राईमच्या वेबसीरिज पाहत होतो. त्यातूनच मृतदेह जतन करण्याची मला माहिती मिळाली. अशी कबुली त्याने आपल्या कबुलनाम्यात दिली आहे.


दरम्यान, या प्रकरणी तपासाला वेग आला आहे. आफताब जावपास अडीच तास पोलिसांनी गुन्हा घडला त्याठिकाणी नेहून तपास केला. सकाळी 11.30 सुमारास पोलीस आरोपीला घेऊन मेहरूलीच्या जंगलात पोहोचले. याठिकाणी पोलिसांनी श्रद्धाच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे हे याच जंगलात फेकले होते. श्रद्धाच्या हत्येनंतर सहा महिन्यांनी या हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना  श्रद्धाच्या शरीराचे काही अवशेष सापडले आहेत. सध्या पोलीस हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घेत आहेत. 


संबंधित बातमी: 


Shraddha Murder Case : सहा महिन्यांनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुजले, तपास करताना फॉरेन्सिक टीमचा कस लागणार