Shraddha Murder Case: मनाचा थरकाप उडवणारा हत्याकांड राजधानी दिल्लीत उघडकीस आला आहे. 28 वर्षांचा मुलगा आफताब याने आपल्या 26 वर्षीय प्रेयसी श्रद्धा हिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रद्धा ही मुंबईची होती. हे दोघे घरचे लग्नाला पर्वांगी देत नाही म्हणून दिल्लीत आले. दिल्लीत आल्यानंतर अवघे 10 दिवस येथे राहिले आणि 10 दिवसातच त्यांचं भांडण झालं. या भांडणानंतर आफताबने या मुलीची गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर कोणालाही या हत्येचा सुगावा लागू नये म्हणून 16 दिवस त्याने तिचे 35 तुकडे केले. यानंतर त्याने हे तुकडे दिल्लीतील मेहरूली जंगलात टाकले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
वेबसीरिज पाहून सुचली हत्याची कल्पना
मेहरूलीच्या जंगलापासून जवळ असलेल्या छत्तरपूरमध्ये हे दोघेही काही दिवस राहिले होते. दोघेही चांगले शिकलेले होते. हे दोघे एका मल्टी नॅशनल कॉल सेंटरमध्ये काम करत होते. तिथे दोघांची मैत्री झाली. यानंतर दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पुढे घरचे लग्नाला परवानगी देत नसल्याने ते दिल्लीत आले. 8 मे रोजी ते दिल्लीत पोहोचल्याची माहिती आहे. यानंतर 19 मे रोजी म्हणजेच 10 दिवसात त्यांच्यात कोणत्या तरी गोष्टीवरून भांडण झालं. या भांडणांतच आफताबने रागाच्या भरात श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि त्याच्यानंतर त्याने तिच्या संपूर्ण मृतदेहाचे 35 तुकडे केले. हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने एक फ्रिज सुद्धा आणला होता. हे तुकडे तो रोज रात्री 2 वाजता घरातून बाहेर पडायचा आणि एक-एक करून ते मेहरूली जंगलात टाकत होता. तो सलग 18 दिवस हे तुकडे जंगलात टाकत होता. जंगलात हे तुकडे टाकत असताना त्याला वाटत होत की, आपण केलेल्या गुन्ह्याबद्दल पोलिसांना कळणार नाही. मात्र 6 महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, डेक्सटर वेब सिरीज पाहिल्यानंतर आफताबने ही हत्या केली. त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना या वेबसीरिजमधून आली, असं सांगितलं जात आहे.
श्रद्धाचे वडील तिला शोधत दिल्लीत आले होते. यानंतर त्यांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्ली पोलिसात नोंदवली होती. यानंतर इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या हत्याकांडाचा खुलासा झाला. आफताबनेही आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र अजूनही श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे सापडलेले नाही आहे. पोलीस श्रद्धाच्या मृतदेहाचा शोध घेत असून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.