Mumbai News : शिंदे गटात सामील झालेले मुंबईच्या (Mumbai) मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या मतदारसंघात शाखाप्रमुख संतोष यादव (Santosh Yadav) यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष यादव यांनी केला आहे.


शिंदे गटात सामील झालेले मुंबईच्या मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात शाखाप्रमुख संतोष यादव यांना मारहाण झाली. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष यादव यांनी केला आहे. वॉर्ड क्रमांक 3 चे शाखाप्रमुख संतोष यादव यांच्या दुकानाचीही तोडफोड करण्यात आली आहे.


मुंबईचा दहिसर पूर्वेतील केतकी पाडा परिसरात शिंदे गट आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात शिवसेना वॉर्ड क्रमांक 3 चे शाखाप्रमुख संतोष यादव यांच्या दुकानांमध्ये काही लोक घुसून बेदम मारहाण केल्याची घटना काल (रविवारी) संध्याकाळी घडली. संतोष यादव यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मात्र दहिसर पोलिसांनी या घटनेसंदर्भात माहिती देताना म्हटलं आहे की, संतोष यादव आणि त्याच परिसरात राहणाऱ्या काही व्यक्तींमध्ये दोन दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. याच कारणावरुन रागाच्या भरात काल संध्याकाळी काही लोकांनी संतोष यादवला बेदम मारहाण केली आहे. या संदर्भात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. 


काय घडलं नेमकं? 


एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतरपासूनच शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात अनेक ठिकाणी जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यापैकी एक प्रकाश सुर्वेंचा मतदारसंघ. मुंबई मागाठाणे म्हणजे, शिंदे गटात सामील झालेल्या प्रकाश सुर्वेंचा मतदारसंघ. याच मतदार संघात शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला बेदम मारहाण करण्यात आली. आमदार प्रकाश सुर्वेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप शाखाप्रमुखानं केला आहे. पण पोलिसांनी मात्र या घटनेबाबत बोलताना वेगळीच माहिती दिली.


मुंबईतील दहिसर भागात आमदार प्रकाश सुर्वेंच्या मतदार संघात शिवसेना वॉर्ड क्रमांक 3 चे शाखाप्रमुख संतोष यादव यांचं दुकान आहे. याच दुकानात काही लोकांनी घुसून त्यांना बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. संतोष यादव यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थकांनीच आपल्याला मारलंय, असा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी हा वाद भांडणातून झाल्याचं म्हटलं आहे.