Shalarth ID Scam: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात (Shalarth ID Scam) नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि भाजप (BJP) पदाधिकारी तसेच बडा शिक्षण संस्थाचालक संजय गरुड (Sanjay Garud) याला सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसमधून नाशिक गुन्हे शाखेने (Nashik Crime Branch) सोमवारी रात्री ताब्यात घेतले आहे.

Continues below advertisement

संजय गरुड हा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील बडे संस्थाचालक आहेत. 20 जानेवारी 2024 रोजी त्याने राष्ट्रवादी शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रकरणी हा बडा मासा गळाला लागल्याने आता घोटाळ्याचे अनेक गूढ धागेदोरे उलगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Shalarth ID Scam: जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याच्या माहितीवरून कारवाई

जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हिंगोणीकरने आपल्या पदाचा गैरवापर करत 259 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य वैयक्तिक मान्यता दिली होती. यातील बहुतांश शिक्षक हे संजय गरुड याच्याच संस्थांमधील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हिंगोणीकरने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारेच एसआयटीच्या पथकाने सोलापुरात सापळा रचून गरुडच्या मुसक्या आवळल्या.

Continues below advertisement

Shalarth ID Scam: 841 कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर, 160 कोटींचा गंडा

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील तब्बल 841 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा या घोटाळ्यात गैरवापर करण्यात आला आहे. मुख्य आरोपी संजय गरुड याच्या 15 शैक्षणिक संस्थांमधील 177 कर्मचाऱ्यांना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचे उघड झाले आहे. या बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे राज्य शासनाची तब्बल 160 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये आतापर्यंत उघडकीस आलेल्या 481 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 438 कर्मचारी हे एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. शालार्थ आयडी घोटाळ्यात संजय गरुड हा अटकेत असलेला सहावा आरोपी आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

NEET पेपर लीकमुळे कुटुंब झालं उद्ध्वस्त, तरूणीनं संपवलं जीवन, वडिलांना दोनदा आला हार्टअटॅक, अर्धांगवायूचा झटका अन्...; नागपुरातील मन सुन्न करणारी घटना