PM Modi Video Ban Facebook:  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने (Facebook) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पोस्ट केलेला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ भारतात रिस्ट्रिक्ट केल्याने मोठा गदारोळ माजला. दिल्लीतील जंतर-मंतरवर (Jantar Mantar) चाललेल्या आंदोलनादरम्यान पीएम मोदींनी तरुणांना संबोधित करण्यासाठी हा व्हिडिओ अपलोड केला होता. मात्र, एबीपी न्यूजने यावर थेट प्रश्न उपस्थित केल्यानंतर मेटा (Meta) कंपनीने आपली चूक मान्य करत हा व्हिडिओ पुन्हा पूर्ववत केला आहे.

Continues below advertisement

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान पीएम मोदी यांनी 'सेल्फी मोड'मध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला होता. या पहिल्या व्हिडिओला फेसबुकने भारतात मध्यरात्री रिस्ट्रिक्ट केले. रात्री 1:25 च्या सुमारास जेव्हा युझर्सने 'सी व्हाय' या पर्यायावर क्लिक केले, तेव्हा "कायदेशीर विनंतीचेपालन करत हा व्हिडिओ रिस्ट्रिक्ट करण्यात आला आहे," असा संदेश दिसत होता. या प्रकारानंतर एबीपी न्यूजने मेटा कंपनीकडे याविषयी विचारणा केली. यानंतर मेटाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, "पंतप्रधानांचा व्हिडिओ चुकीने हटवण्यात आला होता, जो आता दुरुस्त करण्यात आला आहे."

PM Modi: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून गदारोळ

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) समर्थकांनी जंतर-मंतरवर अनेक दिवसांपासून जोरदार आंदोलन छेडले होते. सीजेपीने 20 जुलै रोजी 'संसद मार्च'चे आयोजन केले होते. या दरम्यान जमाव संसदेच्या दिशेने जात असताना पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना रोखले. या आंदोलनादरम्यान तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. हा वाद वाढताना पाहून पंतप्रधान मोदींनी थेट 'जेन-जी' म्हणजेच तरुणांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. यात त्यांनी पेपर लीक प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेतले असून त्यावर कडक कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.

Continues below advertisement

PM Modi: दुसऱ्या व्हिडिओत केली महत्त्वाची घोषणा

यानंतर पंतप्रधान मोदींनी आणखी एक व्हिडिओ शेअर करत परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी मोठ्या निर्णयाची घोषणा केली. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षा प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून पारदर्शक बनवण्यासाठी सरकार या टास्क फोर्सच्या शिफारशी लागू करेल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Exam Reforms Task Force : पेपरफुटी रोखण्यासाठी आता 'आधार' कार्डचे जनक मैदानात, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, हाय-पावर टास्क फोर्सची स्थापना