पुणे : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.  पुण्यात दहा लाख रुपये किमतीचे "सेक्स टॉईज" ( sex toys) जप्त करण्यात आले आहेत. पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी एका गोदामावर छापा ठाकून ही  कारवाई करण्यात आली आहे. 


पोलिसांनी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल शहरातील एका गोडाऊनमधून जप्त केला आहे.  याप्रकरणी एका व्यक्तीवर कलम 292,293 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्या वस्तूंची ऑनलाईन विक्री सुरू होती अशी प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी तपास सुरू असून सेक्स टॉईज सापडलेल्या गोडाऊनमध्ये असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काही अल्पवयीन मुलांना हे सेक्स टॉय विकल्या जात होत्या का याचा तपास पोलिस करत आहेत.  


संकेतस्थळावरून सेक्सटॉईजची विक्री होत असल्याची माहिती लष्कर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पुण्यातील पुलगेट चौकीच्या बाजुला असलेल्या भाजी बाजारच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गोडाऊनमध्ये अनेक सेक्स टॉय होते. याची किंमत जवळपास दहा लाख रूपयांच्या आसपास होती. पोलिसांनी गोदामातील एका व्यक्तीला ताब्यात घेत हा सर्व मुद्धेमाल जप्त केला. 


लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ''एका संकेतस्थळाच्या माध्यमातून या सेक्स टॉईजची विक्री सुरू होती. परंतु, या संकेतस्थळाच्या माध्यमातून खरेदी करणाराचे वय तपासून त्याची विक्री केली जात नसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर फुलगेट येथील गोदामवर छापा टाकला आणि दहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 


दरम्यान, या प्रकरणाचं गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी किती लोकांचा समावेश आहे याची पोलिस माहिती घेत आहेत. 


महत्वाच्या बातम्या


Cyber Terrorism : सायबर दहशतवाद प्रकरणात पहिल्यांदाच आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअरला जन्मठेप; मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल