सातारा: डॉक्टरांच्या मारहाणीमुळे कोरेगाव तालुक्यातील शशिकांत चंद्रकांत बोतालजी या युवकांने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांनी संगनमत करून 14 लाख रुपयांची अफरातफर केली असल्याचा आरोप युवकाने चिठ्ठीमध्ये केला आहे. संबंधित डॉक्टरांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी मृत युवकाच्या नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. 


शशिकांत बोतालजी हा हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्याच्या खात्यावर डॉक्टरांनी टॅक्स वाचवण्यासाठी 6 लाख 10 हजारांचे ट्रांजेक्शन केले आणि जबरदस्तीने नोटरी करून घेत डॉक्टरांनी घर नावावर करून घेतले असा आरोप या चिठ्ठीत करण्यात आला आहे. हे सगळं करत असताना डॉक्टरांनी या युवकाला बेदम मारहाण केल्याचं म्हटलं आहे. 


डॉक्टरांनी केलेल्या या मारहाणीला आणि दबावला कंटाळून युवकाने चिट्ठी लिहून ठेवत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित डॉ. सुहास चव्हाण, डॉ. गणेश होळ आणि डॉ. गोपाळ साळुंखे यांना अटक झाल्याशिवाय युवकाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. नातेवाईकांनी मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवल्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. 


महिलेची धरणात उडी घेऊन आत्महत्या 


आपल्या भावाला फोन करून धरणात उडी मारून एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये समोर आली आहे. ही घटना 24 मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. 'मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, असा कॉल महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला केला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र या महिलेने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. तर जिजाबाई भारत जोगदंड (वय 49 वर्षे, वासनवाडी फाटा, पांगरी रोड, बीड) असे मयत महिलेचे नाव आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिजाबाई जोगदंड या मंगळवारी सकाळी घरात कोणालाही न सांगता पाली येथील धरणावर गेल्या. तिथून त्यांनी आपल्या भावाला मोबाईलवरून फोन केला. मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, असे म्हणत त्यांनी फोन बंद केला. त्यानंतर जिजाबाई यांनी धरणात उडी मारून जीवन संपविले. काही वेळाने त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना परिसरातील लोकांना दिसला. त्यामुळे नागरिकांनी याची माहिती तत्काळ बीड ग्रामीण पोलिसांना दिली.


ही बातमी वाचा: