Satara News Update : साताऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपच्या माजी आमदरांच्या बंगल्याच्या आवारात अर्धवट पुरलेला मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह महिलेचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे ( Kantatai Nalawade ) यांच्या बंगल्याच्या आवारात हा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह या ठिकाणी कोणी पुरला आणि मृतदेह नक्की कोणाचा आहे? याबाबत पोलिस  कसून शोध घेत आहेत.


Satara News Update : स्वच्छता सुरू असताना सापडला मृतदेह


सातारा जिल्ह्यातील वाढे गावच्या हद्दीत भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांचा हा बंगला आहे. परंतु, त्या तेथे राहत नसल्यामुळे तो बंगला बंद असतो. मात्र, बंगल्याच्या आवारातील मागील परिसरात स्वच्छता सुरू असताना कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. परिसरातील नागरिकांनी याबाबत सातारा तालुका पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती समजताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु, मृतदेह नक्की कोणाचा याबाबत अद्याप माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या बंगल्यापरिसरात अशी घटना घडल्यामुळे जिल्हाभरात सध्या मोठी चर्चा सुरू आहे.    


Satara News Update : मृतदेह चिखलात टाकून दिला 


मिळालेल्या माहितीनुसार, हा मृतदेह चिखलात टाकून देण्यात आला होता. सातारा पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतरच या प्रकणाबाबची अधिक माहिती समोर येईल. परंतु, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान, कुजलेल्या स्थितीत असलेला हा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


Kantatai Nalawade : कोण आहेत कांताताई नलावडे?


कांताताई नलावडे या भाजपच्या विधान परिषदेच्या माजी आमदार आहेत. राजकारणासह साहित्य क्षेत्रात देखील कांताताई सक्रिय आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्या 'भरारी' या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री वामन केंद्रे, ज्येष्ठ लेखक डॉ. शिरीष देशपांडे उपस्थित होते.


Kantatai Nalawade : पोलिसांकडून कसून तपास  


कांताताई नलवडे यांच्या बंगल्याच्या परिसरात सापडलेला मृतदेह हा महिलेचा असल्याचं समोर आले आहे. तसेच त्या महिलेचा खून झाला की आणखी काही याबाबत शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. तसेच ती कोण आहे याचाही आद्याप उलघडा झाला नसल्यामुळे पोलिसांना पुढची दिशा ठरवता येत नाही. मात्र पोलिस कसून चौकशी करत असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख समिर शेख यांनी दिली आहे.  


महत्वाच्या बातम्या 


साईबाबाच्या दर्शना आधीच काळाचा घाला, भीषण अपघातात भांडूप येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू