Satara Crime: फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात (Phaltan Doctor Death) तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आत्महत्या केलेली डॉक्टर तरुणी आणि आरोपी प्रशांत बनकर (Prashant Bankar) हे रिलेशनशिपमध्ये होते. काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता, मात्र प्रशांतला डेंग्यू झाल्यानंतर दोघे पुन्हा संपर्कात आले आणि नातं पुन्हा जुळलं. मात्र, प्रशांतने लग्नास नकार दिल्याने डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

Continues below advertisement

तपासात असे उघड झाले आहे की, डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही महिन्यांनंतर त्यांच्यात वाद सुरू झाले आणि प्रशांत तिच्याशी संपर्क टाळू लागला. दोघांमध्ये झालेल्या फोन कॉल्स आणि व्हॉट्सअॅप मेसेजेसचे रेकॉर्ड्स पोलिसांनी हस्तगत केले आहेत. प्रशांत बनकर हा डॉक्टर तरुणी राहत असलेल्या घराच्या मालकाचा मुलगा आहे. 

Satara Crime: प्रशांत बनकर, गोपाळ बदनेला अटक

तपास पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या महिन्यात प्रशांतला डेंग्यू झाला होता. त्या काळात डॉक्टर तरुणी त्याच्याशी पुन्हा संपर्कात आली आणि दोघांचे नाते पुन्हा एकदा जुळले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत प्रशांत बनकर आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला अटक केली आहे. बदनेविरुद्ध डॉक्टर तरुणीच्या सुसाइड नोटमध्ये चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

Satara Crime: महिला आयोगाकडून आढावा

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन या प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आरोपी प्रशांत बनकर याला शेवटचा मेसेज पाठवला होता. मात्र, उपनिरीक्षक बदने याच्याशी तिचा संपर्क सहा महिन्यांपूर्वीच संपला होता. चाकणकर यांनी पुढे सांगितले की, मृत डॉक्टर आणि उपजिल्हा रुग्णालय प्रशासन यांच्यात काही मतभेद होते. रुग्णालयातील तक्रार निवारण समिती आणि पोलिस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यातून डॉक्टरच्या बदलीची शिफारस झाली होती, मात्र त्यांनी तीन वेळा बदली नाकारली. त्यामुळे विशेष नियुक्तीद्वारे त्यांना फलटणमध्येच ठेवण्यात आले, असे त्यांनी म्हटले. 

Satara Crime: आत्महत्येच्या आदल्या दिवशी वाद

तपासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकर यांच्यात फोटो काढण्यावरून किरकोळ वाद झाला होता. फोटो व्यवस्थित न आल्याने झालेल्या वादानंतर डॉक्टर घरातून बाहेर पडल्या आणि जवळच्या देवळात गेल्या. त्यानंतर बनकरच्या वडिलांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत आणले. यानंतर त्या एका हॉटेलवर गेल्या आणि आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकरला मेसेज पाठवला, मात्र त्याचा फोन त्या वेळी बंद होता. आत्महत्येपूर्वीच्या या मेसेजमधून अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Jalgaon Crime Eknath Khadse: मोठी बातमी: जळगावात एकनाथ खडसेंच्या घरात चोरी, सोन्यासह रोकड लांबवली, काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरही पडला होता दरोडा