सातारा: राज्यातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत असताना साताऱ्यातील दोन जणांनी संपूर्ण देशाची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य केले आहे. या दोघांनी थायलंडमध्ये एका तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याची माहिती समोर येत आहे. सातारा (Satara News) जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील दोन जण थायलंड देशात फिरण्यासाठी गेले होते. थायलंड (Thailand) येथील सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातल्या बाण ताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर (Thailand news) या दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे. या घटनेचा आणखी तपशील समोर आलेला नाही. मात्र, या घटनेमुळे सातारकरांची मान शरमेने खाली गेली आहे.
आणखी वाचा