Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची पडसाद उमटू लागले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी एकूण आठ आरोपींपैकी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अजूनही काही आरोपी फरार आहेत. मात्र, पोलिसांनी देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली आहे. 


संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ पोलीस आणि आता हस्तगत केलेली आहे. ज्या स्कॉर्पिओ मधून संतोष देशमुख यांचा अपहरण करण्यात आलं होतं. या अपहरणानंतर संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली.  त्यानंतर सर्व आरोपी हे फरार झाले होते.  आरोपी असलेल्या प्रतीक घुले याला देखील बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. पुण्यामधून घुले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर जी स्कार्पिओ यामध्ये वापरण्यात आली ती स्कार्पिओ पोलिसांनी आता हस्तगत केली आहे.


सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणात एसआयटी स्थापन करा; प्रकाश सोळंके यांची मागणी


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद जिल्हाभरात पाहायला मिळाले. ही घटना घडल्यानंतर आज आमदार प्रकाश सोळंके यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक जिल्ह्यात दहशत निर्माण करत आहेत. आणि सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांना तपास न देता यात एसआयटी स्थापन करा, अशी मागणी सोळंके यांनी केली आहे.


सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, या भूमिकेतून काल ग्रामस्थांनी सकाळपासून रस्ता रोको सुरु केला होता. रास्ता रोकोला मनोज जरांगे पाटील आणि बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी भेट दिली आणि चर्चा केली.  केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर आरोपींसोबत हितसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. बीडचे एस पी अविनाश बारगळ यांनी राजेश पाटील यांच्या तडकाफडकी निलंबन केलं होतं.. केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल सुद्धा वरिष्ठांना पाठवणार असल्याचे सांगितलं होतं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Sarpanch Santosh Deshmukh : बायकोनंतर स्वत: झाले सरपंच, 2012 पासून ग्रामपंचायतीवर सत्ता, अपहरण करुन हत्या झालेले संतोष देशमुख कोण होते?