All India Panther Sena on Parbhani Violance : ईव्हीएम मुद्दा संपवण्यासाठी परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेची विटंबना केली, असा आमचा थेट आरोप आहे. तसेच घटनेमागे भाजप आणि भाजपा हस्तक असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केला आहे. ईव्हीएम सुद्धा आम्हीच हटवू आणि अस्मिता सुद्धा आम्हीच जपणार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले आहे.
परभणीच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करा. आंदोलनाच्या आडून आमच्या तरुणांचे आयुष्य बरबाद करण्याचे षडयंत्र आम्ही हाणून पाडणार आहोत. भीम सैनिकांची कोम्बिंग किंवा त्यांना अटक करू नका. दंगल घडवण्यासाठीच विटंबना केली हे आता सिद्ध झालंय, असा आरोपही दिपक केदार यांनी केला आहे.
परभणीकडे जाणाऱ्या बसफेऱ्या देखील रद्द
परभणीत जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर इतर जिल्ह्यातून जालना मार्गे परभणी आणि जिंतूर जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बस जालन्यातील मंठा येथील बसस्थानकावर थांबवल्या आहेत. तर जालन्यातील परतुर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या 7 बस फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. काही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
परभणी हिंसाचार प्रकरणी जमावबंदीचे आदेश!
परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबनेच्या प्रकरणात आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या हाकेला हिंसक वळून लागलं असून आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तसेच पोलिसांच्या गाडींवर ही दगडफेक करण्यात आली, काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी (Police) ॲक्शन घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, परभणी बंदच्या हिंसक वळणावर परभणीचे जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शहरात जमावबंदीचे आदेश काढले आहे. परीसारत 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. आज दुपारी 1 वाजेपासून ते पुढील आदेश येईपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे. तसेच सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र, ध्वनीक्षेपके आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे ही आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलक आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी संवाद साधत शांततेचही आवाहन केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या