Numerology: तसं पाहायला गेलं तर, प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिच्या जोडीदाराने तिचा प्रत्येक शब्द ऐकावा, तिच्या प्रत्येक परिस्थितीत तिला साथ द्यावी. मात्र, काही मुलं अशी असतात ज्यांना आपल्या लव्ह पार्टनरचा त्रास अजिबात सहन होत नाही. गर्लफ्रेंडला कधीच भाव देत नाही, तसेच ते त्यांच्या गर्लफ्रेंडची कधीच स्तुती करत नाहीत, तिला खास वाटण्यासाठी एखादी भेटवस्तू किंवा सरप्राईज प्लॅन देखील करत नाहीत. अंकशास्त्रानुसार, अशा जन्मतारखांची मुलं स्वभावाने चांगली असतात, परंतु त्यांना त्यांच्या गर्लफ्रेंडचा त्रास सहन करून घेत नाही, जाणून घ्या...


गर्लफ्रेंडचे नखरे अजिबात सहन होत नाही...


अंकशास्त्राच्या मदतीने जन्मतारीख पाहून व्यक्तीचा स्वभाव, करिअर, आरोग्य, आर्थिक परिस्थिती आणि नातेसंबंध इत्यादींशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. आज अंकशास्त्राच्या मदतीने आम्ही तुम्हाला त्या तारखांबद्दल सांगणार आहोत ज्या दिवशी जन्मलेल्या मुलांना त्यांच्या गर्लफ्रेंडचे नखरे अजिबात सहन होत नाही. अंकशास्त्रानुसार, त्या जन्मतारखांबद्दल जाणून घ्या..


मुलींचे मूड स्विंग सहन होत नाही, ना त्यांचे कौतुक...


अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 8, 13, 18, 22, 27 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या मुलांना त्यांच्या जोडीदाराचा त्रास सहन होत नाही. उलट प्रेयसीलाच त्याचा त्रास सहन करावा लागतो. या मुलांना ना मुलींचे मूड स्विंग सहन होत नाही ना त्यांचे कौतुक. ही लोक त्यांच्या गर्लफ्रेंड काय म्हणतात ते सहज समजू शकत नाही. मुलींपेक्षा त्यांना तयार व्हायला जास्त वेळ लागतो. ते त्यांच्या गर्लफ्रेंडपेक्षा स्वतःला जास्त महत्त्व देतात. कोणालाही पटकन दिलेली भेटवस्तू त्यांना आवडत नाही. या लोकांना एकट्याने खरेदी करायला आवडते.






या जन्मतारखेची मुलं निष्ठावान


अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 4 असते. राहू हा क्रमांक 4 चा स्वामी मानला जातो. या जन्मतारखेला जन्मलेली मुलं गर्लफ्रेंडचा त्रास सहन करून घेत नसले तरी ते वैवाहिक जीवनात अत्यंत निष्ठावान असतात. ही मुलं त्यांच्या जोडीदारांप्रती एकनिष्ठ असतात, जे त्यांना कधीच फसवत नाहीत.


हेही वाचा>>>


Numerology: स्वत:चं सीक्रेट शक्यतो सांगत नाहीत, 'या' जन्मतारखेचे लोक वयाच्या 30 नंतर लग्न करून यशस्वी होतात, अंकशास्त्रात म्हटलंय..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )