सांगली : विश्रामबाग येथून अपहरण करण्यात आलेल्या एका वर्षाच्या चिमुकल्या बाळास शोधण्यास आणि बाळ चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगली पोलिसांना (Sangli Police) यश आलं आहे. सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अपहरण झालेल्या बाळाचा शोध घेऊन त्याला तिच्या आईच्या स्वाधीन केले. या अपहरण नाट्यामध्ये तिघांचा समावेश असून यापैकी एकास अटक करण्यात आली आहे तर अन्य दोन फरारी आहेत. यात एका महिलेचाही समावेश आहे. 

Continues below advertisement

सांगलीमध्ये 20 ऑक्टोबर रोजी बाळ चोरीचा प्रकार घडला होता. याबाबत बाळाच्या आईने तक्रार दिल्यानंतर सांगली पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार तिघांनी आईजवळ झोपलेल्या बाळाचे अपहरण केल्याचे समोर आले. 

Sangli Crime News : बाळाची विक्री झाल्याचं समोर

पोलिसांनी गोलंदाज नामक संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर सदरचे बाळ हे रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे असल्याचे समोर आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने सावर्डे येथे जाऊन सदरचे बाळ ताब्यात घेतले. त्यावेळी या बाळाची विक्री झाल्याचं समोर आलं.

Continues below advertisement

याप्रकरणी इनायात गोलंदाज, इम्तियाज पठाण आणि वासिमा पठाण यां तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी इनायत याला अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित दोघे फरार आहेत.

Children Kidnapping Gang : बाळ चोरी करणारी टोळी

ज्या दाम्पत्यांना मुलं होत नाहीत अशांना बाळ चोरून विक्री करणारी ही टोळी असल्याचं समोर आलं. सांगली पोलिसांच्या या कामगिरीमुळे आईपासून वेगळं झालेल्या एक वर्षाचा चिमुकला पुन्हा त्याच्या कुटुंबाकडे सुरक्षीत पोहोचला आहे.

ही बातमी वाचा: