UNESCO Internship Program : आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची इच्छा असलेल्या भारतीय तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. युनेस्को (UNESCO) ने पोस्टग्रॅज्युएट (Postgraduate Students) आणि पीएचडी (PhD Students) विद्यार्थ्यांसाठी इंटरनॅशनल इंटर्नशिप प्रोग्राम (International Internship Program) जाहीर केलं आहे. या इंटर्नशिपद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना जागतिक स्तरावर व्यावहारिक अनुभव (Global Practical Experience) मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आपले शैक्षणिक आणि तांत्रिक ज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत करू शकतात.
UNESCO Internship : युवांसाठी जागतिक करिअरची वाट
युनेस्कोचा हा इंटर्नशिप प्रोग्राम विशेषतः पोस्टग्रॅज्युएट आणि पीएचडी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार careers.unesco.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांना जागतिक कार्यक्षेत्रात व्यावसायिक अनुभव देणे आणि त्यांचे कौशल्य अधिक विकसित करणे आहे.
UNESCO Internship Educational Qualification : पात्रता आणि शैक्षणिक अर्हता
- इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्यांकडे मास्टर्स डिग्री, पीएचडी किंवा त्याच्या समकक्ष उच्च शिक्षण कार्यक्रम असणे आवश्यक आहे.- जर उमेदवाराने गेल्या 12 महिन्यांत मास्टर्स किंवा पीएचडी पूर्ण केली असेल, तरीही अर्ज करता येईल.- ग्रॅज्युएट स्तरावरील विद्यार्थी फक्त त्या परिस्थितीत अर्ज करू शकतात, जेव्हा ते सध्या पोस्टग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये नामांकित असतील किंवा गेल्या 12 महिन्यांत पदवी पूर्ण केली असेल.- सचिवीय किंवा तांत्रिक पदांसाठी अर्ज करणाऱ्यांनी संबंधित विद्यापीठ किंवा तांत्रिक संस्थेत शेवटच्या वर्षात असणे आवश्यक आहे.
International Internship Program : भाषिक आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक
- उमेदवारांना इंग्रजी किंवा फ्रेंच भाषेचे उत्कृष्ट ज्ञान असणे आवश्यक आहे. मुख्यालयातील सचिवीय पदांसाठी दोन्ही भाषांवर प्रभुत्व आवश्यक असू शकते.- तसेच MS Office, Google Workspace यासारख्या ऑफिस सॉफ्टवेअरमध्ये प्रवीणता हवी.- आंतरराष्ट्रीय वातावरणात टीमवर्क करण्याची क्षमता, उत्तम संवादकौशल्य आणि किमान 20 वर्षे वय ही अट लागू आहे.
UNESCO Job : अर्ज करण्यापूर्वी काय तयारी करावी?
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी प्रेरणा पत्र (Motivation Letter) आणि बायोडाटा (CV/Resume) तयार ठेवावा.- अर्ज प्रक्रिया पूर्णपणे इंग्रजी किंवा फ्रेंच भाषेत असेल. जर कागदपत्रे इतर भाषेत असतील, तर त्यांचे साधे भाषांतर तयार ठेवणे गरजेचे आहे.- तसेच तुमचा ईमेल आणि फोन नंबर किमान 6 महिने सक्रिय ठेवावा, कारण पुढील संवादासाठी त्यांचा वापर होईल.
ज्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर अनुभव घ्यायचा आहे आणि यूनेस्कोसारख्या प्रतिष्ठित संस्थेसोबत काम करण्याचे स्वप्न आहे, त्यांच्यासाठी ही इंटर्नशिप सुवर्णसंधी ठरू शकते.
ही बातमी वाचा: