Sangli Crime : अधिक दूध देणाऱ्या गायी (Cow) कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून पशुपालक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार सांगलीत समोर आला आहे. सांगली (Sangli) जिल्ह्याच्या जत तालुक्यातील सोन्याळ, जालिहाळ खुर्द इथल्या 15 हून अधिक पशुपालकांना परराज्यातील टोळीने ऑनलाइन लाखो रुपयांचा गंडा घातल्याचं स्पष्ट झालं आहे. राजस्थान, पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत.
कशाप्रकारे केली पशुपालक शेतकऱ्यांची फसवणूक?
राजस्थान, पंजाब आणि हरियाणा राज्यांतील टोळीकडून शेतकऱ्यांना व्हिडीओ कॉल करुन किंवा जर्सी गायीचे व्हिडीओ पाठवले जातात. अधिक दूध देणाऱ्या गायी कमी किमतीत मिळत असल्याने शेतकरी यावर विश्वास ठेवतात. गायी पसंत पडल्यानंतर त्यांच्या व्यवहार ठरतो. त्यानंतर वेळोवेळी शेतकऱ्यांना ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितलं जातं. त्यानंतर उर्वरित सर्व रक्कम पाठवा तरच गायी पाठवू, असं सांगितलं जातं. थोडे पैसे पाठवलेल्या शेतकऱ्यांना आपण गायी पाठवत असून गाडीमध्ये गायी भरत असल्याचे ऑनलाईन पद्धतीने दाखवले जाते. मात्र नंतर पूर्ण रक्कम पाठवा, तोपर्यंत गायी असलेले वाहन तुमच्या भागात येणार नाही असं सांगितलं जातं. संपूर्ण पैसे देऊनही गायी न मिळाली नाही. तसंच रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आपली फसवणूक झाल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
अशी झाली फसवणूस!
या सगळ्या आमिषाला सोन्याळ येथील राजू सरगर बळी पडले. त्यांनी फेसबुकवरील गायीची जाहिरात बघून जयपूर येथील कैलासचंद यादव याच्याशी फोनवरुन संपर्क साधला. यादव याने व्हिडीओ कॉल करुन जर्सी गायी दाखवल्या. गायी पसंत पडल्यानंतर 1 लाख 50 हजारांना व्यवहार ठरला. सरगर यांनी वेळोवेळी 1 लाख 16 हजार रुपये ऑनलाईन पाठवले, मात्र यादवने गायी न पाठवल्याने पुन्हा संपर्क साधला असता, सर्व रक्कम ट्रान्सफर करा तरच गायी पाठवू, असे सांगितलं. तसेच रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली. जालिहाळ खुर्द येथील विठ्ठल पाटील, अनिल पाटील, संजय चव्हाण, राहुल पाटील यांनी देखील फेसबुकवर जर्सी गायीचा फोटो, खरेदीबाबतचा मोबाईल नंबर पाहिला. जयपूर येथील रामसहाय छोटूराम गुर्जर याच्याशी संपर्क साधला. व्हिडीओ कॉलद्वारे त्याने गायी दाखवल्या. आठ गायींचा व्यवहार केला. गाडीचे भाडे पाठवण्यास सांगितले. त्यांनी एकूण 1 लाख रुपये पाठवल्यानंतर आठवडाभराने गायी वाहनात भरल्याचं व्हिडीओ कॉलद्वारे दाखवलं. बिले दखवली. आणखी पैसे पाठवण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी राहिलेले पैसे पाठवण्यास सांगितले. मात्र, व्यवहाराचा संशय आल्याने पैसे पाठवले नाहीत. आठवड्याभराने शेतकऱ्यांनी फोन केला असता, सर्व रक्कम पाठवली नसल्याने गायी पाठवल्या नाहीत, असं सांगितलं. पैसे देण्यासही नकार दिला. सध्या त्याचा फोन बंद आहे.
पोलिसांनी परराज्यातील टोळीवर कारवाई करण्याची मागणी
कमी किमतीत अधिक दूध देणाऱ्या गायी देण्याचं आमिष दाखवणारं हे मोठं रॅकेट आहे, असं समोर आल्यानंतर चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांनी जत तालुक्यातील फसवणूक झालेल्या पशुपालकांसह पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची भेट घेतली. याबाबत परराज्यातील टोळीतील लोकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करावी तसंच शेतकऱ्यांना त्यांची रक्कम परत मिळावी याची तजवीज करावी, अशी मागणी तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे.
पोलिस अधीक्षकांकडून कारवाईचे आदेश
हेही वाचा