Rohit Arya Encounter मुंबई : पवईमध्ये ऑडिशनला बोलावून 17 मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्य या व्यक्तीचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर (Rohit Arya Encounter) केला. दरम्यान या एन्काऊंटरप्रकरणी आता अनेक खुलासे समोर येत असताना पोलिसांच्या कारवाईवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेअशातच या प्रकरणी पोलिसांना एन्काऊटर करायची वेळ का आली? याचं स्पष्टीकरण गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीत द्यावं लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Continues below advertisement


रोहित आर्या पोलिसांचा संवाद सुरू असताना, आत मध्ये लहान मुले आहेत याची कल्पना असताना टोकाचं पाऊल का उचललं? पोलिसांना अतिरिक्त मदत घटनास्थळी दाखल असताना पोलिसांनी आत जाण्याचं धाडस का केलं? या प्रश्नांची उत्तर या आॅपरेशनमध्ये सहभागी झालेल्या पोलिसांनाही गुन्हे शाखेच्या चौकशी दरम्यान विचारली जाणार असल्याची माहिती आहे.


Rohit Arya Encounter Inside Story : शिक्षण विभागाबाबत आरोप, अधिकाऱ्यांचाही जबाब नोंदवला जाणार?


पवई पोलिसांनी अमोल वाघमारे यांच्या तक्रारीनुसार पवई पोलिस ठाण्यात कलम 109 (1), 140, 287 बी एनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल वाघमारे यानेच रोहित आर्याने हल्ला केल्यानंतर त्याच्या प्रतिउत्तरात रोहित आर्यावर गोळी झाडली होती. आर्याने नुसत्या अल्पवयीन मुलांनाच नाही तर त्याच्यासोबत अन्य 3 व्यक्तींनाही ओलीस ठेवल्याचे तपासात समोर आले आहे.


या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे शाख करत असून आर ए स्टुडिओच्या आॅपरेशनमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांचाही गुन्हे शाखेचे पोलिस जबाब नोंदवणार आहे. शिवाय आर्याने हे टोकाचं पाऊल का उचललं शिक्षण विभागाबाबत त्याने केलेले आरोप याची सत्यता पडताळण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचाही जबाब नोंदवला जाऊ शकतो, अशीही शक्यता आहे.


Rohit Arya Death: मृत्यूचं गूढ वाढलं! तीन डॉक्टरांकडून दोन तास शवविच्छेदन, संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ


मुंबईतील पवई (Powai) येथे १७ मुलांना ओलीस धरल्यानंतर पोलीस कारवाईत ठार झालेल्या रोहित आर्याच्या (Rohit Arya) मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-mortem) तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनलसमोर करण्यात आले. 'शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॅमेरा समोर करण्यात आली आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल दोन तास लागले,' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


शवविच्छेदनावेळी रोहित आर्याच्या कुटुंबातील एक सदस्य शवविच्छेदन कक्षाबाहेर उपस्थित होता, तसेच गुन्हे शाखेचे पोलीसही घटनास्थळी हजर होते. रोहित आर्याने मुलांना ओलीस धरण्यापूर्वी एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये त्याने म्हटले होते की तो आत्महत्या करण्याऐवजी एक मोठे पाऊल उचलत आहे आणि त्याला काही नैतिक प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे, ज्यामुळे या प्रकरणाची संवेदनशीलता अधिकच वाढली आहे.


ही बातमी वाचा: