अहिल्यानगर : जिल्हा पोलिस दलाने बसमधून महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत जोडप्यास जेरबंद केले आहे. या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे, चोरीच्या गुन्ह्यात पकडलेली आरोपी कोमल काळे (Komal Kale) ही तब्बल 50 हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेली रील स्टार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कोमल काळे हिला पाथर्डी बसस्टँड परिसरातून ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान तिने आपला प्रियकर सुजित चौधरी याच्याकडे चोरीचा माल दिल्याचं कबुल केलं. पोलिसांनी तातडीने सुजितला शेवगाव येथून अटक केली.
Komal Kale Reel Star Arrested : साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
या 'बंटी-बबली' जोडीकडून पोलिसांनी 9,35,230 किमतीचा ऐवज जप्त केला आहे. यात 6.5 तोळे सोन्याचे दागिने, दीड लाखांहून अधिक किमतीचा आयफोन 17 प्रो मॅक्स आणि इतर रोख रक्कम आणि मोबाईलचा समावेश आहे. पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये भा.न्या.सं. 2023 च्या कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास पाथर्डी पोलिस करीत आहेत.
शीतल तेजवानीला अटक
मुंढव्यातील 40 एकर जमीन घोटाळाप्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे (Pune) पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. त्यामध्ये, प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.
ही बातमी वाचा: